नागपूर :- नागपूर कोषागार अंतर्गत येणाऱ्या मुळ निवृत्तीवेतन धारकांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांना निवृत्तीवेतन देण्यात येते. वयाची 80 वर्ष पूर्ण केल्यानंतर वाढीव दराने अतिरिक्त कुटुंब निवृत्तीवेतन देय ठरते. परंतु वयाचा पुरावा नसल्यामुळे बऱ्याच कुटुबांना वाढीव निवृत्तीवेतन देण्यात आले नाही. अशा सर्व निवृत्तीवेतन धारकांनी आधार कार्ड, पॅन कार्ड, जिल्हा शल्य चिकित्सक यांनी प्रमाणित केलेले वयाचे प्रमाणपत्र यापैकी एक पुरावा वरिष्ठ कोषागार अधिकारी कार्यालयामध्ये सादर करावा असे आवाहन वरिष्ठ कोषागार अधिकारी गीता नागर यांनी केले आहे.