संदीप कांबळे,कामठी
कामठी प्रतिनिधी २९ मार्च- भारतीय जनता पार्टी कामठी शहरच्या पदाधिकाऱ्यांनी माजी पालकमंत्री, विधानपरिषद सदस्य आ चंद्रशेखर बावनकुळे यांना निवेदन सोपवून कामठी शहरातील प्रधानमंत्री आवास योजना, अण्णाभाऊ साठे दलित वस्ती सुधार योजना, जिल्हा खनिज प्रतिष्ठान योजना आदी योजनातील दिरंगाई बद्दल तोडगा काढण्यासाठी प्रशासकीय अधिकाऱ्यांची बैठक लावण्याची मागणी केली
निवेदन देणाऱ्या शिष्टमंडळात भाजप पदाधिकारी लालसिंग यादव,उज्वल रायबोले,विक्की बोंबले, जितेंद्र खोब्रागडे यांचा समावेश होता.
विधान परिषद सदस्य आ चंद्रशेखर बावनकुळे यांनी याबाबत लवकरच प्रशासकीय अधिकाऱ्यांची बैठक लावण्यात येईल असे आश्वासन भाजपच्या पदाधिकाऱ्यांना दिले
प्रलंबित योजनांच्या अंमल बजावणी साठी आ बावनकुळेना निवेदन
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com