संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी ता प्र 4 :- नागपंचमीनिमित्त ऑरेंज सिटी टाऊनशीप समोरील नाग मंदिरात आयोजित भव्य महाप्रसाद वितरण कार्यक्रमाला भाविकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून पाचशे च्या वरील भाविकांनी या महाप्रसादाचा आस्वाद घेतला.
या महाप्रसाद वितरण कार्यक्रमासाठी यशवंतराव कुल्लरकर ,चेतन कुल्लरकर, रोहन कुल्लरकर प्रशांत साबळे ,अमोल मानवटकर , रोहित देशमुख , नितेश जाड़े, समीर सददेव, उज्वल रायबोले आदीनी मोलाची भूमिका साकारली.