कामगारांचे दैवत डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव
नागपूर :-देशातील कामगारांचे दैवत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्मदिवस १४ एप्रिल रोजी आहे. कामगारांना हा उत्सव साजरा करण्यासाठी आर्थिक टंचाई निर्माण होऊ नये म्हणून महानिर्मितीत कार्यरत समस्त कंत्राटी कामगारांना १४ एप्रिल पूर्वी वेतन देण्यात यावे, अशी विनंती राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष भुषण चंद्रशेखर यांनी राज्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना केली आहे.
परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जन्मदिवस हा केवळ जन्मदिवस नसून एक उत्सव आहे. त्याकाळापासून तर आजपर्यंत कामगारांसाठी कल्याणकारक धोरण कोणीच जाहीर केले नव्हते. डॉ. भीमराव आंबेडकर यांचे जीवन खूप संघर्षमय आणि प्रेरणादायी आहे. शेतमजुरांना किमान मजुरी देणें
औद्योगिक कामगारांना पुरेसा पगार व पगारी सुरक्षा कामगार संघटनेला मान्यता मिळवून देणें, वर्षातून कमीतकमी २४० दिवस काम करणाऱ्या कामगारांना कायम करवून घेणे, कामगारांना दिवसभरात केवळ ८ तासांचे काम, नोकरीत असताना जर कामगारांचा अपघात अथवा मृत्यू झाला तर मालकांकडून कामगाराला नुकसान भरपाई,कामगार कायद्यांचे एकत्रीकरण,मालक आणि कामगार यांच्यात औद्योगिक विवाद झाल्यास, दोघांत समेट घडवून आणण्यासाठी यंत्रणा निर्माण करणे, मालक आणि कामगार यांच्या कोणत्याही वाटाघाटीसाठी तरतूद करणे याचप्रमाणे १९४८ च्या ‘किमान वेतन कायदा’ची तरतूद ज्यामुळे आजही लाखों मजुरांना फायदा होत आहे.
स्त्रियांना कारखाना कायद्या अन्वये रात्री काम करण्यास बंदी, स्त्रियांना प्रसूती काळात भर पगारी सुट्टी, बारमाही कामगारांना आपल्या हक्काची भर पगारी सुट्टी, सक्तीची तडजोड किंवा लवाद हे तत्व कामगारांच्या न्यायासाठी कायम स्वरूपाचे केले
१९४५ साली बाबासाहेबांनी एक अतिशय महत्त्वाचा निर्णय घेतला ज्याचा आजही सर्व नोकरदारांना फायदा मिळतो. डॉ. बाबासाहेबांनी ही धोरणे केवळ आखली नाहीत तर त्यांचा पाठपुरावा देखील केला. कामगारांच्या परिवाराला १४ एप्रिल हा दिवस साजरा करण्यात आर्थिक अडचणी येऊ नये करीता महानिर्मितीने वेतन संबंधित परिपत्रक काढावे, अशी मागणी कामगारांच्या वतीने भुषण चंद्रशेखर यांनी केली आहे.
फाईल फोटो