रामटेक :- एस. टी. महामंडळाच्या बसेसमुळे प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या विविध समस्यांसाठी व त्रासांबद्दल मनसे रामटेक तालुका अध्यक्ष शेखर बेलसरे यांचे नेतृत्वात रामटेक आगार प्रमुखांना निवेदन देत समस्या त्वरीत मार्गी लावण्याची मागणी करण्यात आली. यावेळी मनसे रामटेक कार्यकारणीचे विविध पदाधिकारी उपस्थित होते.
बसेस ची कमतरता, नियोजीत वेळेवर बसेस न सोडणे, संबंधित ठिकाणची एक बस सुटल्यावर दुसरी बस लागण्यामध्ये खुप उशीर होणे, रस्त्यावरील बस थांब्यावर तासनतास बस ची वाट पहात ताटकळत उभे राहाणे, शालेय विद्यार्थ्यांना नियोजित वेळेवर बस न लागल्याने शाळेत तथा महाविद्यालयात जाण्यासाठी उशीर होणे आदी. समस्यांमुळे प्रवाशांसह शालेय विद्यार्थी पुरते त्रासलेले आहे. तेव्हा यासर्व समस्यांची दखल घेत मनसेचे रामटेक तालुका अध्यक्ष सेवक बेलसरे यांनी पदाधिकारी, कार्यकर्त्यांना सोबत घेत रामटेक एस.टी. आगार गाठले व तेथील व्यवस्थापकांना जाब विचारत समस्यांबाबद एक निवेदन नुकतेच २४ जुलै ला दिले. यावेळी योगायोगाने जिल्हा नियंत्रक नागपूर विभाग हे सुद्धा उपस्थित होते. दरम्यान आगार व्यवस्थापकांनी सदर समस्यांचे निवेदन स्विकारुन तोडगा काढण्याचे आश्वासन दिले. याकामी तालुका अध्यक्ष सेवक बेलसरे यांना मनसेचे जिल्हा अध्यक्ष शेखर दुंडे , जिल्हा अध्यक्ष मनसे शेतकरी संघटन सुरेश वांदीले व उपजिल्हा अध्यक्ष रोशन फुलझेले यांचे मार्गदर्शन लाभले. या प्रसंगी उपस्थितांमध्ये डॅनी धनोरे पारशिवनी तालुका अध्यक्ष, रॉकी चवरे, नरेंद्र पांडे माजी तालुका अध्यक्ष पारशिवनी, मनोज पालीवाल, विनायक महाजन, अनिवेष देशमुख, प्रदीप मनघटे, विक्की धुर्वे, मुकेश भोंडेकर, हर्ष ढगे, बजरंग काटोले, संजय टेकाम, आदर्श वाढीवे, मंगेश वाढीवे, संदीप मेश्राम, महेंद्र मरस्कोल्हे, कुंदन मेश्राम, सुरज मेश्राम, प्रफुल पुसदेकर, मयूर तळेगावकर, नितेश देशभ्रतार तसेच इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.