भाग दुसरा : फडणवीसांच्या राशीला कटकटी आणि दादांची साडेसाती

दहा जून ची सकाळ उगवल्या उगवल्या सुप्रिया सुळे भांगडा करून मोकळ्या झाल्या असतील जयंत पाटील झिम्मा फुगडी खेळून थकले असतील भाया प्रफुल्ल पटेल यांचा गरभा खेळणे अद्याप सुरूच असेल आणि रोहित पवार खिडकीतून दिसणाऱ्या पोपटाला नक्की वाकुल्या दाखवण्यात गुंग असतील कारण या चारही पक्षांतर्गत विरोधकांचे त्यांच्या मनासारखे पवारांनी केले आणि स्वतः एकांतात अभंग ऐकायला निघून गेले. विशेष म्हणजे पवारांनी अजित पवार यांच्या जवळचा लाडका विश्वासू आवडता साथीदार सुनील तटकरे यांना देखील ऐनवेळी मुका घेत मोका दिला आणि अजित पवार यांच्यापासून साथीदाराला कोसो दूर नेला केला थोडक्यात ज्यांना यापुढे एका झटक्यात तटकरे छाप सुवर्ण संधी हवी असेल अशा साथीदारांनी अजितदादा यांना दूर ढकलावे आणि मला बिलगावे त्यांच्या देखील सुप्त इच्छा पूर्ण होतील अन्यथा ज्या सुनील शेळके धनंजय मुंडे यांच्यासारख्या दादांच्या साथीदारांना भाजपाचे दरवाजे ठोठवायचे असतील त्यांनी ते खुशाल ठोठवावेत, पवार त्यांना देखील डोळा मारून मिचकावून सायो नारा करून मोकळे होतील. अजितदादांचे आता एवढ्यात नक्की काही खरे नाही कारण भाजपाचा त्यांनी विश्वासघात केलेला असल्याने आणि दादा कसे बिनभरवंशाचे हे काकांनी आधीच मोदी शाह यांना पटवून सांगितले असल्याने भाजपा लगेचच अजित पवार यांना भाजपामध्ये प्रवेश देऊन देवेंद्र फडणवीस आणि भाजपाची डोकेदुखी वाढवून ठेवेल असे अजिबात वाटत नाही, जेव्हा आपल्याला राष्ट्रवादीत एकटे पाडण्यात येणार आहे आपला बऱ्यापैकी कचरा करून आपलेउरले सुरले नेतृत्व काका नक्की संपविण्याच्या मार्गावर आहेत किंबहुना त्यांनी राजकीय निवृत्ती स्वीकारण्यापूर्वी तशी शपथच घेतली आहे हे जेव्हा अगदी पुराव्यांसहित अजितदादा यांना कळले तेव्हा त्यांनी मोठ्या राजकीय हालचाली करायला सुरुवात केली होती…

मध्यप्रदेशात फार पूर्वी चंपाबाई नावाचा खून खटला गाजला होता. चंपाबाईचे गावातल्या तरुणावर प्रेम होते तरीही तिचे शेजारच्या गावातल्या एकाशी लग्न लावून देण्यात आले. मग काय, चंपाबाई दरवेळी नवऱ्याशी भांडण उकरून काढायची आणि माहेरी आली कि पूर्वीच्या प्रियकराला भेटायची त्यातून तिला त्या प्रियकरापासून दोन वेळा दिवस गेले आणि मुले झाली. हे जेव्हा नवर्याच्या लक्षात आले तेव्हा त्याने तिचा खून केला तरीही लोकांनी, न्यायाधीशांनी नवऱ्याला सजा माफ केली. अजितदादा म्हणजे चंपाबाई आणि नवरा म्हणजे काका शरद पवार, दादा हे असे दरवेळी रुसून फुगून भाजपा मध्ये जाण्याच्या धमक्या देतात म्हसणून काकांनी एकाच दमात दादाला राजकारणात नोव्हेअर केले तरीही काकांना पवारांच्या घरातल्यांनी आणि राष्ट्र्वादीतल्या तटकरे यांच्यासहित समस्त नेत्यांनी दादांच्या पाठीराख्यांनी आणि सामान्य कार्यकर्त्यांनी अगदी मनापासून माफ केले त्याचवेळी अजितदादा यांना राष्ट्रवादी आणि भाजपा सहित साऱ्यांनी सध्या तरी एकटे पडलेले आहे, राजकारणातली अति हुशारी दादांच्या हि अशी अंगलट आलेली आहे, हेच ते अजित पवार ज्यांनी एकेकाळी देवेंद्र फडणवीस यांना असेच धोका देऊन एकटे पडून तोंडावर आपटून दादा काकांना बिलगले होते त्याचवेळी काकांनी, पोरा तुझा खेळ मी असाच खल्लास करेन अशी म्हणे मनाशी शपथ घेतलेली होती जी आत्ता सत्यात उतरवून काका मोकळेझाले आहेत गालातल्या गालात खुद्कन हसून गोल गोल गिरक्या ते घेताहेत. अजित पवार यांना आता सावध झालेली भाजपा अगदी लगेचच आपल्याकडे घेणार नाही किंबहुना भाजपा नेत्यांनी दादांना भाजपामध्ये घेण्याचा मूर्खपणा उतावीळपणा अजिबात करू नये अन्यथा ज्या राष्ट्रवादीत कायम पैशांचा आणि हेव्यादाव्यांचा धुडगूस घालून अजित पवार कायम स्वतः सार्या प्रकारची मजा मारण्यात व्यस्त होते आणि इतरांना फाट्यावर मारून वरून दादागिरी करण्यात स्वतःला धन्य समजत होते अखेर काकांनीच पुतण्याची खाशी जिरवली म्हणून भाजपाने लगेच दादांना बाहुपाशात घेऊन डिस्को करू नये. विशेष म्हणजे काँग्रेस तशीही अजित पवारांना आपल्याकडे खेचणार नाही आणि अजितदादा कधीही उद्धव ठाकरेंच्या हाताखाली काम करणार नाहीत, एकनाथ शिंदे म्हणजे पर्यायी भाजपा, बघूया भाजपा कशी हुशारीने निर्णय घेते. राज्यातल्या राजकारणाची दिशा बदललेली आहे, फडणवीस आणि राज्याचे राजकारण विषय येथेच संपणार नाही. दादांचे खंदे समर्थक कोण व ते नेमका कोणता कुठला कसा निर्णय घेतील तेही सांगून मी मोकळा होईल…

अपूर्ण : हेमंत जोशी

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

यशवंत पंचायत राज अभियान पुरस्कार, काटोल पंचायत समिती राज्यात द्वितीय

Tue Jun 13 , 2023
नागपूर :- यशवंत पंचायत राज अभियानात उत्कृष्ट काम केल्याबद्दल काटोल पंचायत समितीची राज्यस्तरावरील दुसऱ्या क्रमांकाच्या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. सन २०२१-२२ या आर्थिक वर्षामध्ये केलेल्या कामाचे मूल्यमापन विचारात घेऊन विभागस्तर व राज्यस्तर अशा दोन स्तरावर “यशवंत पंचायत राज अभियान” ही अभिनव पुरस्कार योजना राबविण्यात आली होती. या पुरस्कार निवडीबाबतचा शासन निर्णय आज 12 जून 2023 रोजी ग्राम विकास विभागामार्फत […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com