नागपूर :- दि. 7 ऑक्टोबर 2002 रोजी कमला नेहरू महाविद्यालय, सक्करदरा चौक नागपूर येथे कनिष्ठ महाविद्यालयात पालक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थी पालक व शिक्षक यांच्यात विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती व चर्चा व्हावी हा या पालक मेळाव्याचा उद्देश होता.
या महाविद्यालयाचे प्राचार्य दिलीप बडवाईक यांनी पालकाच्या विद्यार्थ्यालाही सूचना असेल तरी त्यांनी महाविद्यालयातील शिक्षकांना सागाव्यात तसेच त्यावर कशाप्रकारे मात करावी हे शिक्षक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतील असे आश्वासन दिले. पालकांनी आपल्या अपेक्षा विद्यार्थ्यावर लादू नये आणि त्यांना आवड असेल त्या क्षेत्रामध्ये त्यानी करिअर करायचे आहे. विद्यालयातील विद्यार्थ्यांना दैनदिन अभ्यास करताना कोणत्या प्रकारच्या अडचणीला सामोरे जावे व कशाप्रकारे मात करावी, याबाबत प्राचार्यानी मुलाचे मोलाचे मार्गदर्शन केले. पालकांनी विद्यार्थ्यांचे मनोबल वाढविण्याचे प्रयत्न करून त्याना चांगल्याप्रकारे यशस्वी होण्याकरिता सहकार्य करावे असे आवाहन त्यानी केले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दिलीप बडवाई हे होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विज्ञान शाखेचे शाखाप्रमुख संतोष कोले यानी केले. सूत्रसंचालन कला शाखेचे बालाजी कोडापे यानी केले तर आभारप्रदर्शन वाणिज्य शाखाप्रमुख सुबोध बोबडे यांनी केले. महाविद्यालयातील शिक्षक तसेच विद्यार्थी मोठया सख्येने उपस्थित होते.