मुंबई :- महाराष्ट्राचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी जगविख्यात सारंगीवादक पद्मविभूषण पंडित राम नारायण यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले आहे. पंडित राम नारायण यांनी आपल्या अद्भुत वादनातून सारंगी हे वाद्य आंतरराष्ट्रीय स्तरावर नेले. त्यांच्या सारंगीचे स्वर हृदयस्पर्शी व स्वर्गीय आनंद देणारे होते. पंडित राम नारायण यांनी देश विदेशात अनेक उत्तमोत्तम शिष्य घडवले व आपले ज्ञान मुक्तहस्ताने वाटले. त्यांचे दैवी संगीत त्यांच्या पश्चात देखील शतकानुशतके कायम राहील. त्यांच्या निधनामुळे सारंगीतील एक पर्व संपले आहे. पंडित राम नारायण यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो व आपल्या शोकसंवेदना त्यांचे कुटुंबिय, शिष्यपरिवार व संगीत प्रेमींना कळवतो, असे राज्यपालांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.
“पंडित राम नारायण यांच्या सारंगीचे स्वर हृदयस्पर्शी होते” – राज्यपाल राधाकृष्णन
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com