यवतमाळ :- जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र व बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने दि.18 मार्च रोजी सकाळी 10 वाजता शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, यवतमाळ येथे रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
या मेळाव्याकरीता एकुण 477 रिक्तपदे प्राप्त झालेली आहे. त्यापैकी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण या योजनेकरीता 80 रिक्तपदे प्राप्त झालेली आहे. वैभव एन्टरप्रायजेस, नागपूर, विनय टिव्हीएस, यवतमाळ, रेमण्ड युको डेनिम प्रा. लि. यवतमाळ, स्वतंत्र मायक्रोफिन प्रा. लि अमरावती, मेडिअसिस्ट इन्सुरन्स टिपीए प्रा. लि., संसूर सृष्टी एन्टरप्रायजेस, यवतमाळ, हिमालय कार्स, यवतमाळ ईत्यादी कंपनी, उद्योजक सहभागी होणार आहे. या सर्व कंपनी, उद्योजकांमार्फत 12 वी पास, आयटीआय, पदविका, पदविधर तसेच व्यवसायीक अभ्यासक्रम पुर्ण केलेले ईच्छुक उमेदवारांना रोजगाराच्या संधीचा लाभ घेता येणार आहे.
उमेदवारांनी rojgar.mahaswayam.gov.in तसेच cmykpy.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पध्दतीने अर्ज करून दि. 18 मार्च रोजी बाबाजी दाते आणि वाणिज्य महाविद्यालय, यवतमाळ येथे प्रत्यक्ष स्वखर्चाने मुलाखतीसाठी आवश्यक शैक्षणिक कागदपत्रे, स्वत:चा रिझ्युम बायोडाटा, पासपोर्ट फोटोसह उपस्थित रहावे व संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त प.भ. जाधव यांनी केले आहे.