वीज कंत्राटी कामगारांना 20,000 रु पगारवाढ द्या !

– नागपूर : महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाची वीज कंपन्याकडे मागणी

कोराडी :- वीज कंत्राटी कामगारांना 20000 रूपये पगार वाढीचा मागणीचा प्रस्ताव महाराष्ट्र राज्य वीज कंत्राटी कामगार संघाने वीज कंपनीकडे सादर केला आहे ,अशी माहीती वीज कंत्राटी कंत्राटी कामगार संघाचे कोराडी कार्याध्यक्ष पवन कोठारे यांनी दिली.

राज्यातील महावितरण महापारेषण व महानिर्मिती कंपनीतील नियमित रिक्त पदांवर मागील 15 ते 20 वर्षे काम करत असलेल्या वीज कंत्राटी कामगारांना कायम करण्यात यावे अथवा समान काम समान वेतन किंवा कंत्राटदार विरहित रोजंदारी पद्धतीने वयाच्या 60 वर्षा पर्यंत जॉब सिक्युरिटी देण्यात यावी.

या बाबत धोरणात्मक निर्णय घेई पर्यंत या कामगारांना 20,000 रुपये पगारवाढ करावी, त्यांना सुरक्षा साधने, मेडिक्लेम, प्रशिक्षण, गणवेश, रेनकोट, बूट, गणवेश धुलाई भत्ता, मोबाईल व पेट्रोल भत्ता, ओव्हर टाईम,जादा सुट्या मिळाव्या अशा अनेक कामगार हिताच्या व पगार वाढ मागण्यांचा प्रस्ताव वीज कंपनीला महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाच्यां पदाधिकारी यांनी सोमवार दिनांक 20 सप्टेंबर रोजी सादर केला आहे.

मागील कराराच्या वेळेस मुळ वेतनात केवळ 20% ,पगार वाढ मिळाली होती आता 1 एप्रिल 2023 पासून 2028 पर्यत नवा करार होईल, ऊर्जामंत्री व वीज कंपनी प्रशासन यावेळी देखील सहानुभूती पूर्वक या मागण्याचा विचार करेल असा विश्वास राज्य संघटनेने व्यक्त केला आहे. अशी माहिती पवन कोठारे यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

CAIT DEMAND DIGITAL PAYMENT REGULATION BOARD & WAIVER OF CHARGES ON DIGITAL PAYMENTS

Sat Sep 23 , 2023
Nagpur :- In furtherance of the vision of Prime Minister Narendra Modi for adoption of Digital payments and landmark decision of G20 summit to extend digital economy to MSMEs, the Confederation of All India Traders ( CAIT) has urged Union Minister for IT  Ashwini Vaishnav and Finance Minister  Nirmala Sitharaman to constitute a Digital Payment Promotion Board in order to […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com