यवतमाळ :- जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र व शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, पांढरकवडा यांच्या संयुक्त विद्यमाने दि.20 जून रोजी सकाळी 10 वाजता आयटीआय पांढरकवडा येथे रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
रोजगार मेळाव्याकरीता स्वतंत्र मायक्रोफीन प्रायव्हेट लिमिटेड अमरावती, अन्नपुर्णा फायनान्स प्रायव्हेट लिमिटेड नागपूर, मुथुट मायक्रोफिन प्रायव्हेट लिमिटेड यवतमाळ, कैट एडुसिस प्रायव्हेट लिमिटेड पुणे, पियाजिओ व्हेईकल पुणे, आर्म्स आय प्रा. लिमिटेड छत्रपती संभाजीनगर या आस्थापनेमार्फत एकुण 600 रिक्त पदांकरीता मुलाखती घेण्यात येणार आहे.
रोजगार मेळाव्यामध्ये 10 वी, 12 वी, पदविधर, पदविकाधारक आयटीआय ट्रेडच्या उमेदवारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहे. जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांनी रोजगार मेळाव्यामध्ये सहभाग नोंदवून रोजगाराची संधी प्राप्त करून घ्यावी व आपला रोजगार निश्चित करावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्त वि. सा. शितोळे व जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी जी.यु.राजुरकर यांनी केले आहे.