मोहितेवाडी गाव हद्दीतील गॅस टँक स्फोट प्रकरणात नुकसानग्रस्त घरांचे पंचनामे – अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ

मुंबई :- शेलपिंपळगांव मोहितेवाडी (ता. खेड, जि. पुणे) या गावाच्या हद्दीतील चाकण – शिक्रापूर रस्त्यावर मोहितेवाडी येथे 19 मे 2024 रोजी पहाटे गॅस वाहतूक करणाऱ्या गॅस टँकरचा स्फोट झाल्याची घटना घडली होती. या घटनेत कुठलीही जिवीतहानी झाली नसून या प्रकरणी चाकण पोलीस स्टेशनमध्ये टँकचा चालक, क्लीनर, ढाबा मालक यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे परीसरातील 39 घरांचे नुकसान झाले आहे. याबाबत महसूल व सार्वजनिक बांधकाम विभागाच्यावतीने संयुक्त पंचनामे करण्यात येत असून त्यानंतर पुढील कार्यवाही करण्यात येईल, असे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी आज विधानसभेत लक्षवेधी सुचनेच्या उत्तरात सांगितले.

यासंदर्भात सदस्य दिलीप मोहिते – पाटील यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती.

मंत्री भुजबळ पुढे म्हणाले, घरगुती गॅसचा अवैध वापर रोखण्याबाबत राज्यातील गॅस एजन्सींच्या तपासणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. राज्यात 1 एप्रिल 2024 पासून 1186 तपासण्या करण्यात आल्या असून पुणे जिल्ह्यात 63 तपासण्या आहे. तसेच खेड तालुक्यात 7 तपासण्या करण्यात आल्या आहेत. तसेच पोलीसांनी गॅस वाहतूक करणाऱ्या कंपनीवर गुन्हा दाखल केलेला नाही व 8 फेब्रुवारी 2024 रोजी घडलेल्या घटनेबाबत चौकशी करण्यात येईल. पोलीसांकडून याबाबत कारवाई करण्यात येईल.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

साइबर फ्रॉड में गंवाए 7.23 लाख...लेकिन पुलिस के दौड़ने से पैसे वापस मिल गए

Fri Jul 5 , 2024
नागपुर :- साइबर अपराधियों के शेयर ट्रेडिंग फंड में हेराफेरी कर 7.23 लाख रुपये गंवाने वाले युवक को साइबर पुलिस से बड़ी राहत मिली है. साइबर थाने की टीम ने तकनीकी माध्यम से जांच की और अपराधियों के बैंक खाते से पैसे बरामद किये. रजत भैया अस्तकर (29, टीचर्स कॉलोनी, नरसाला) नामक युवक ने जनवरी में फेसबुक पर ग्लोबल वर्क […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com