पंचायती राज समितीचा आजपासून नागपूर दौरा

नागपूर  : पंचायती राज समिती नागपूर जिल्हा परिषदेला कामकाजाचा आढावा घेणार असून आज  7 एप्रिलपासून या समितीचा दौरा सुरू होणार आहे. आपल्या तीन दिवसीय कार्यकाळामध्ये जिल्हा परिषदेच्या कामकाजाचे परिक्षण ही समिती करणार आहे.

            जिल्हा परिषदेकडून मिळालेल्या माहितीनुसार पंचायती राज समिती 7 एप्रिलला सकाळी 10.30 ते 11 या काळात नागपूर जिल्ह्यातील विधानसभा व विधानपरिषद सदस्यासोबत तसेच 11 ते 11.30 या काळात नागपूर जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांशी शासकीय विश्रामगृह नागपूर येथे अनौपचारिक चर्चा होणार आहे. त्यानंतर जिल्हा परिषदेच्या आबासाहेब खेडकर सभागृहात बैठक घेऊन आपल्या दौऱ्याला समिती सुरुवात करणार आहे.

            8 एप्रिल रोजी पंचायत समिती निहाय भेट देणार असून कामाचा आढावा व पंचायत समिती स्तरावर बैठकी घेणार आहेत. तसेच दिनांक 9 एप्रिल रोजी पुन्हा आबासाहेब खेडकर सभागृह जिल्हा परिषद नागपूर येथे कामाचा आढावा बैठक घेणार आहेत.

         आमदार संजय रायमुलकर हे पंचायती राज समितीचे प्रमुख असून निमंत्रित सदस्यांसह समिती आमदारांची एकूण संख्या 32 आहे. सर्व सदस्य उद्या पर्यंत नागपूर येथे पोहोचणार असून उद्या प्रत्यक्ष कामकाजाला सुरुवात होणार आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

सरकारला कोणताही धोका नाही. पुढील अडीच वर्षांने निवडणुका होतील तेव्हाही हेच सरकार येईल - शरद पवार

Thu Apr 7 , 2022
राज्यातील प्रलंबित १२ आमदार नियुक्ती व संजय राऊत यांच्यावरील कारवाईसंदर्भात शरद पवारांनी घेतली पंतप्रधानांची भेट… दिल्ली  – केंद्रीय यंत्रणा करत असलेल्या कारवाईमुळे सरकारला कोणताही धोका नाही. सरकार चांगले चालले आहे. पुढील अडीच वर्षांने निवडणुका होतील तेव्हाही हेच सरकार येईल असा स्पष्ट विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला. आज  शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com