बेला :- भगवान कोलबा स्वामी पिठात गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने आज 22 जुलैला बेला येथे भव्य पालखी दिंडी यात्रा काढण्यात येत आहे यावेळी पिठाचे पिठाधिश्र्वर आचार्य राधेश्याम स्वामी व गुरूमाऊली रमादेवी प्रामुख्याने उपस्थित राहणार आहे.
22 जुलै ला भगवान कोळबास्वामीच्या मूर्तीचा अभिषेक पंचामृताने राधेश्याम स्वामी यांच्या हस्ते होईल. मुंबईचे सुप्रसिद्ध गायक संगीतकार, चंद्रकांत गिरकर यांचे दुपारी भजन होईल. गुलाल उधळीत ढोल, घोडा, भजन, दिंडीच्या गजरात भव्य पालखी यात्रा निघेल. बाजारातील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पालखी विसावा घेईल. पिठात आल्यावर फार मोठ्या शिंक्यावरून दहीहंडी फोडण्यात येईल. जन समुदायाना महाप्रसादाचे वाटप करून थाटात सांगता होईल गुरुपौर्णिमा व दीपोत्सवाचे यशस्वीतेसाठी पुंडलिक चौधरी दहेगाव शुक्रकांत, रमेश व शालू मेंडुले, वेणुबाई कुंभारे, लताबाई देशमुख, शोभा हिंगणेकर , माणिक देशमुख, सुशिल धार्मिक, समरावणी धार्मिक, कृष्णा मेंदुले, विलासराव उजवने, स्वानंदी मेंदुले , देवराव महाजन, सौरभ गाठीबांधे, केतन मेंदुले , हरीदास मेंदुले, उजवने , मधुरवणी गाठीबांधे , उशा डोबस्कर, पंकज देशमुख, हरीदास मेंदुले , लक्ष्मण खोडके कल्पना खोडके असंख्य भक्त मंडळी यांनी परिश्रम घेत आहे .