पारशिवनी :- तालुक्यातिल ग्राम पंचायत पालासावळी येथे आज सांयकाळी कालभैरव देवस्थान – पेठ येथे ग्रामस्थांसह विकास कार्यासंबंधी चर्चा करून देवस्थानाची समस्या जाणून घेतली. नंतर माजी उपसभापती व वरिष्ठ नेते गज्जु यादव यांनी आश्वस्त केले की लवकरच देवस्थानपरिसर विकासा करिता आवश्यक निधी मंजूर करण्याचा प्रयत्न करणार.देवस्थान परिसरात बेकायदेशीर कार्य करीत असणाऱ्या असामाजिक तत्वांच्या लोकांवर शासन प्रशासना कडून कायदेशीर कार्यवाही करून घेणार याबाबत उपस्थितांना हमी दिली.
यावेळी पाळासावळी चे सरपंच राजेंद्र ठाकुर, शालिक ढोंगे, रामभाऊ ठाकुर,फजीत कोरडे, पतिराम पिलारे, गिरधारी ढोगे, संतोष कोरडे, माणिक राऊत, पुसाराम उकेपैठे, रणवीर यादव, अमित सिंग, सानू शेख, अतुल दानव यांचेसह कालभैरव देवस्थान पंच कमेटी कालभैरव परसोडी (पेठ), अध्यक्ष नितेश ढोंगे, उपाध्यक्ष आसाराम उकेपैठे, सचिव अश्विन भरणे, सहसचिव निकेश बगमारे, कोषाध्यक्ष पंकज पिलारे, सहसर्व सदस्य , ग्राम पंचायत सदस्य तथा गावकरी व शेतकरी मोठी संख्येत उपस्थित होते.
पालासावळी कालभैरव देवस्थानपेठ येथे देवस्थान परिसरात विकासाकरिता निधी मंजूर करण्याचा प्रयत्न करणार – वरिष्ठ नेते गज्जु यादव
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com