पोरवाल महाविद्यालयातील पजई दाम्पत्याचा चालण्याच्या व धावण्याच्या स्पर्धेत सुवर्ण पदकासह विजय..

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी

कामठी ता प्र 21 :- भारत देशाच्या 75  व्या स्वातंत्र्याच्या निमित्ताने आजादी का अमृत महोत्सव ह्या बनरखाली राज्यस्तरीय 43 वी महाराष्ट्र मास्टर ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप -2022 स्पर्धा

मास्टर ॲथलेटिक्स स्पोर्ट्स अँड वेल्फेअर असोसिएशन यवतमाळ आणि डिस्ट्रिक्ट स्पोर्ट्स ऑफिस यवतमाळ यांच्या संयुक्त विद्यमाने यवतमाळ येथे आयोजित करण्यात आली होती.

या स्पर्धेसाठी महाराष्ट्रातील तमाम स्त्री आणि पुरुष यांनी सहभाग नोंदवला होता. या स्पर्धेत सहभाग घेण्यासाठी म्हणून पोरवाल महाविद्यालयातील शिपाई  विलास जी पजई आणि त्यांच्या पत्नी भारती विलास पजई यांनी मागील वर्षीपासूनच पहिला क्रमांक मिळवायचा या जिद्दीने जिवापाड मेहनत घेतली होती. या स्पर्धेमध्ये  त्यांनी 5 किलोमीटर पायी चालणे पुरुष वय 45+50 या गटातील स्पर्धेत पहिला क्रमांक सुवर्ण पदकासह प्राप्त केला असून 800 मीटर धावणे पुरुष 45+50या स्पर्धेत तिसरा क्रमांक कांस्यपदकासह प्राप्त केला आहे.

ह्या स्पर्धेत ते एकटेच सहभागी झाले नसून त्यांनी आपल्या सोबत आपल्या पत्नीला सुद्धा सहभाग नोंदवून एक प्रकारचा आदर्श समाजामध्ये निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. ह्या स्पर्धेत त्यांच्या पत्नीने स्त्री गटातून वय 30+35 या स्पर्धेत 400+100 रीले ह्या गटातून पहिला क्रमांक सुवर्णपदकासह प्राप्त केला आहे. तर 5 किलोमीटर स्त्री वय 30+35 या गटातून पायी चालणे या स्पर्धेत पहिला क्रमांक सुवर्णपदकासह  प्राप्त केला आहे.

विलास पजई आणि भारती पजई या विजयी दाम्पत्याचे कौतुक महाविद्यालयातील सर्व स्तरातून होत आहे.विशेषता महाविद्यालयाचे प्राचार्य प्रोफेसर डॉ.विनय चव्हाण

यांनी या दाम्पत्याने हा विजश्री प्राप्त केल्याबद्दल अभिनंदन केले असून महाविद्यालयाच्या उपप्राचार्या डॉ.रेणू तिवारी आणि उपप्राचार्य डॉ.मनिष चक्रवर्ती यांनी सुद्धा ह्या पजई दाम्पत्याचे  अभिनंदन करून कौतुक केले आहे. शिवाय महाविद्यालयाचे प्रबंधक स्वप्नील राठोड यांनी सुद्धा पजई दाम्पत्याचे अभिनंदन केले आहे.महाविद्यालयातील क्रीडा विभागाचे विभागप्रमुख डॉ. प्रशांत बांबल, डॉ. जयंत रामटेके,डॉ. इंद्रजित बासू, प्रा. मल्लिका नागपुरे यांनी सुद्धा त्यांचे अभिनंदन करून कौतुक केले आहे. महाविद्यालयातील इतर प्राध्यापक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी सुद्धा या दाम्पत्याचे अभिनंदन करून कौतुक केले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

नेपाल ने रामदेव के दवाओं को काली सूची में डाला

Wed Dec 21 , 2022
– विभाग द्वारा जारी नोटिस के मुताबिक, सूचीबद्ध कंपनियों द्वारा निर्मित दवाओं का नेपाल में आयात या वितरण नहीं किया जा सकता है। नागपुर – नेपाल के औषधि नियामक प्राधिकरण ने योग गुरु रामदेव के पतंजलि उत्पादों का निर्माण करने वाली दिव्य फार्मेसी सहित 16 भारतीय दवा कंपनियों को यह कहते हुए काली सूची में डाल दिया है कि वे […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com