– नागपुर ग्रामीण पोलीसांची कारवाई
नागपूर :- दिनांक ०५/०८/२०२४ रोजी पोस्टे एमआयडीसी बोरी येथील स्टाफ पोस्टे हद्दीत अवैध चंद्यावर रेड संबंधाने पेट्रोलिंग करीत असतांना मुखविरद्वारे विश्वसनीय खबर मिळाली की, पोलीस स्टेशन एमआयडीसी बोरी हद्दीतील सुकळी बेलदार येथील अब्दुल शेख यांचे किरायाचे मकानाचे बाजूला असलेल्या सार्वजनिक ठिकाणी मोकळ्या जागेत काही लोक ५२ तासपत्त्यावर पैशाची बाजी लावुन हारजीतचा जुगार खेळत असल्याची गोपनिय माहीती पोस्टे एमआयडीसी बोरी येथील स्टाफ यांना प्राप्त झाले वरून सदर स्टाफ यांनी सुकळी वेलदार येथील अब्दुल शेख यांचे किरायाचे मकानाचे बाजूला असलेल्या मोकळया जागेत सापळा रचुन छापा टाकुन आरोपी नामे १) शुभम प्रकाश देशमुख रा. वार्ड क्र. ५ सुकळी २) रोहित माणिकराव चारोरकर रा. वार्ड क्र. ६ ३) करण जयसिंग मोहिते रा वार्ड नं. ६ ४) अमोल रामप्रसाद पटले रा. वार्ड नं. ६ चारही रा. सुकळी बेलदार एमआयडीसी बोरी हे जुगार खेळतांनी मिळून आले. एकुण ०४ जुगारी इसम यांना ताब्यात घेवुन त्यांचे ताब्यातुन १) एक लाल रंगाची निळे पट्टे असलेली प्लास्टिकची चटई २) ५२ तास पत्ते ३) नगदी ५२००/- रू चा मुद्देमाल जप्त करून आरोपीतांविरूध्द पोलीस ठाणे एमआयडीसी बोरी येथे कलम १२ महाराष्ट्र जुगार अधिनियम अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सदरची कार्यवाही ही पोलीस अधीक्षक नागपूर ग्रामीण हर्ष ए. पोद्दार (भापोसे), अपर पोलीस अधीक्षक रमेश धुमाळ यांचे मार्गदर्शनाखाली पोस्टे एमआयडीसी बोरी येथील ठाणेदार सपोनि राजीव कर्मलवार, पोउपनि खोत, पोना श्रीकांत गौरकर यांनी पार पाडली.