अन्यथा अन्न त्याग आंदोलन करू !

– विद्यृत ग्राहकांना बिल भरण्यासाठी वेळ द्या – अजय मेश्राम

भंडारा :- महाराष्ट्र राज्य विद्यृत वितरण विभागाच्या वतीने नुकतेच दिनांक ३१/०१/२०२४ ला CE/B&R/ Recovery /03411 या पत्रा व्दारे विद्यृत वितरण विभागाच्या वतीने बिल सर्दभात थकबाकी दाराना पुर्ण बिल भरणा करण्याच्या सर्दभात जुलमी निर्णय घेतला आहे.या निर्णयामुळे भंडारा जिल्हयातील अनेक विद्यृत ग्राहकांना मोठया अडचणीचा सामना करावा लागणार आहे.विद्यृत वितरणच्या या निर्णयामुळे ग्राहक व विद्यृत कर्मचारी यांच्या मध्ये नाहक वाद होवून ग्राहक व कर्मचारी यांच्यात हाणामारीची देखील शक्यता नाकारता येत नाही.या सर्दभात उपमुख्यमंत्री तथा उर्जामंत्री यांना जिल्हाधिकारी यांच्या मार्फत दिनांक १४/०२/२०२४ ला निवेदन देण्यात आलेत.

वितरण विभागाच्या वतीने घेतलेला निर्णय हा आठ दिवसाच्या आत मध्ये परत घेतला नाही तर विद्यृत वितरणाच्या विरोधात राष्ट्रवादी काँगे्रस पार्टी शरद पवार यांच्या पक्षाच्या वतीने भंडारा-पवनी विधानसभा अध्यक्ष अजय मेश्राम यांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयच्या पूढे अन्न त्याग आदोलनावर बसणार आहेत. याची दखल प्रशासनाच्या वतीने घेण्यात यावी अशा ईशारा देण्यात आले आहेत.निवेदनात थकबाकीदारांना बिल भरण्यात मुदत देण्यात यावी, प्रि पेड मिटर संबंधी पायाभूत सुविधा दिल्या शिवाय लावू नये ,प्रि पेड मिटर लावण्या संबंधी सक्ती करुन नये तो एच्छीक करावे,शेतकर्‍यांना २४ तास विज पूरवठा करण्यात यावा या मागण्यावर गांर्भियाने विचार करण्यात असे निवेदनात म्हटंले आहेत. निवेदन देते वेळीस जिल्हाध्यक्ष किरण अतकरी , मधुकर चौधरी शहर अध्यक्ष,यशवंत भोपे जिल्हा उपाध्यक्ष, सुखराम अतकरी सहकार सेल जिल्हा अध्यक्ष,राजा खॉन सचिव, श्याम कळंबे मोहाडी तालुका अध्यक्ष, महिला शहर अध्यक्ष शाहिना खान, रुपाली साखरकर, श्रुती बावनकुळे, ईश्वर कळंबे भंडारा तालुका अध्यक्ष, राकेश श्यामकुवर जिल्हा मिडिया प्रमुख, नितीन तलमले उपाध्यक्ष विधानसभा, गणेश ठवकर किसान अध्यक्ष मोहाडी तालुका, प्रफुल्ल मेश्राम युवा अध्यक्ष लाखनी,जितेंद्र श्यामकुवर लाखनी तालुका युवक उपाध्यक्ष, भाऊदास धुर्वे, सत्वधिर दहीवले, रुपचंद लिंगायत, विलास झोडापे, विजय नवखरे लाखनी ओबीसी अध्यक्ष , यशवंत भोयर,बुध्दे, गजभिये शहापूर, विजय बारई, आशीष पडोळे,राजु येरपुडे, अजय सेलोकर व ईतर पदाधिकारी उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी ‘स्वीप’ उपक्रमांवर भर द्यावा - जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे

Tue Feb 20 , 2024
– निवडणूक कामासाठी नेमलेल्या सर्वांच्या शंभर टक्के टपाली मतदानासाठी प्रयत्न करा पुणे :- आगामी लोकसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढविण्याच्यादृष्टीने ‘स्वीप’ उपक्रमांवर भर देण्यासह प्रत्यक्ष विविध घटकांपर्यंत जाऊन जनजागृती करावी, तसेच निवडणूक कामासाठी नेमलेल्या सर्व अधिकारी- कर्मचारी, पोलीस दलातील कर्मचारी यांचे टपाली मतदान होईल याची विशेष दक्षता घ्या, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी दिले. लोकसभा निवडणूक- २०२४ च्या अनुषंगाने […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com