नाशिक : शिर्डी येथे पशुसंवर्धन विभागाच्या वतीने देशातील सर्वात मोठे आणि राष्ट्रीय स्तरावरील ‘महापशुधन एक्स्पो 2023’ चे आयोजन 24 ते 26 मार्च, 2023 दरम्यान करण्यात आले आहे. देशातील 13 राज्यांतील पशुधन बघण्याची संधी या प्रदर्शनातून मिळणार आहे.
शास्त्रोक्त पद्धतीने पशुपालन करण्यासाठी आवश्यक यंत्रे, उपकरणे तसेच पशुसंवर्धनाशी निगडित बाबींसाठीच्या उत्पादनांचे स्टॉल सुमारे 46 एकराच्या क्षेत्रामध्ये उभारण्यात येणार आहेत. 65 प्रकारच्या विविध पशुपक्षांच्या प्रजाती या प्रदर्शनात सहभागी होणार आहेत.