नागपूर :- दिनांक २०.०७.२०२३ रोजी जागतीक बुद्धीबळ दिनानिमीत्य परिमंडळ क्र. ०४ येथे नागपुर शहर पोलीस दलातील पोलीस अधिकारी व अमलदार यांचे करीता बुध्दीबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते त्यामध्ये एकुण २० पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी सहभाग घेतला होता. त्यामध्ये स्पर्धेचे विजेते नापोअं. जितेंद्र चौधरी पोलीस ठाणे ईमामबाडा तर उपविजेते पो.अ. सुभाष करिहार पोलीस ठाणे वाठोडा हे ठरलेले होते. विजेत्यांना डॉ. शिवाजी राठोड अप्पर पोलीस आयुक्त, दक्षिण प्रा. विभाग नागपुर शहर यांचे हस्ते प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह व सहभागी अधिकरी अंमलदार यांना प्रमाणपत्र देवून बक्षीस वितरण करण्यात आले.
परिमंडळ क्र.०४ येथे जागतिक बुध्दीबळ दिनानिमीत्य स्पर्धेचे आयोजन करून विजेत्यास बक्षीस वितरण
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com