सामान्य रुग्णालय, गडचिरोली येथे एचआयव्हीसह जीवन जगणाऱ्या लोकांसाठी सामाजिक संरक्षण शिबिराचे आयोजन

गडचिरोली :-  जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण पथक गडचिरोली तथा काळजी व आधार केंद्र विहान प्रकल्प गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने एआरटी सेंटर जिल्हा सामान्य रुग्णालय, गडचिरोली येथे एचआयव्हीसह जीवन जगणाऱ्या लोकांसाठी सामाजिक संरक्षण शिबिराचे आयोजन जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. या शिबिराचे प्रमुख उद्घाटक म्हणून जिल्हा विधी प्राधिकरण, गडचिरोलीचे सचिव आर.आर. पाटील तर शिबिराचे अध्यक्षस्थानी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अनिल रुडे तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा बाल संरक्षण अधिकारी गुरनूले, क्षयरोग जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. हेमके, विहान प्रकल्पाचे प्रकल्प संचालक जोसेफ आदी उपस्थित होते.याप्रसंगी सर्व लाभार्थ्यांना विविध सामाजिक योजना बाबतीत माहिती मान्यवरांनी दिली. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक महेश भांडेकर कार्यक्रम अधिकारी डापकु, गडचिरोली. सदरील कार्यक्रमासाठी डापकु, एआरटी स्टाफ व विहान प्रकल्प कर्मचारी यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे सुत्र संचालन व आभार प्रदर्शन समुपदेशक संजय उमडवार यांनी केले. या प्रसंगी दुर्धर आजार प्रमाणपत्राचे व बस पासचे वाटप करण्यात आले. तसेच बालसंगोपन योजनेबाबत अडचनी सोडवून लाभ देण्यास सहकार्य करण्याबाबत सांगण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डापकू, एआरटी, विहान प्रकल्प कर्मचाऱ्यांनी मोलाचे सहकार्य केले. असे जिल्हा कार्यक्रम अधिकारी, सामान्य रुग्णालय, गडचिरोली यांनी कळविले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या स्वयंसहाय्यता बचत गटांना मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने पुरवणेबाबत

Wed Nov 16 , 2022
गडचिरोली :-  सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग शासन निर्णय क्र. एटीटीएस-2016/प्र.क्र.125/अजाक दि. 08 मार्च 2017 नुसार “अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या स्वयंसहाय्यता बचत गटांना मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने पुरवणे” या योजनेत अमुलाग्र बदल करण्यात आला असून सदर योजनेअंतर्गत लाभार्थी बचत गटाना देण्यात येणारे (अर्थसहाय्य) हे वस्तु स्वरुपात न देता मंजूर अर्थसहाय्याची जास्तीत जास्त रक्कम रु. 03.15 लाख बचत […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com