– 3000 शेतकऱ्यांना काजुची रोपे व २० शालेय मुला-मुलींना सायकलचे वाटप
गडचिरोली :- गडचिरोली जिल्हा पोलीस दलाच्या वतीने पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली असलेल्या “पोलीस दादालोरा खिडकी ” च्या माध्यमातुन गडचिरोली जिल्ह्यातील नागरिकांचे जीवनमान उंचावण्याच्या उद्देशाने विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. याचाच एक भाग म्हणून दिनांक १६/०५/२०२३ रोजी गडचिरोली पोलीस दल पोलीस दादालोरा खिडकिच्या माध्यमातून उपपोस्टे पेरमिली येथे ‘भगवान बिरसा मुंडा भव्य कृषी मेळावा, जनजागरण मेळावा व आरोग्य शिबीर’ पार पडला.
यावेळी मेळाव्यात दुर्गम-अतिदुर्गम भागातील ३००० च्या वर शेतकरी बांधव उपस्थित होते. उपस्थित नागरिकांना विविध NGO मार्फत प्राप्त झालेल्या खालीलप्रमाणे साहीत्यांचे वाटप करण्यात आले. यामध्ये ३००० शेतकर्याना काजुची रोपे २० शालेय मुला-मुलीना सायकल, उज्वला गॅस योजनेंतर्गत २० गॅस शेगडी, २० भाजीपाला बियाणे किट, ३०० सयकल ५० तर लहान मुलांचे कपडे, शाल, २०० रजीस्टर व पेन, ०२ दिव्यांग व्यक्तांना तीनचाकी सायकलचे वाटप करण्यात आले. यासोबतच उपपोस्टे पेरमिली कढून काजू लागवड व संवर्धन, भाजीपाला लागवड व मत्स्यपालन याबाबत स्थानिक मराठी व माडीया भाषेतील २०० प्रती माहिती पुस्तीकेचे वितरण व प्रकाशन करण्यात आले. तसेच आयोजीत करण्यात आलेल्या आरोग्य शिबीरामध्ये उपस्थित नागरीकांची वैद्यकिय अधिकारी यांचेकडून मोफत आरोग्य तपासणी करुन त्यांना औषधी चे वाटप करण्यात आले.
याप्रसंगी उपस्थित शेतकन्यांना पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी गडचिरोली जिल्ह्यातील शेतकरी व इतर जनतेनी आपली आर्थिक प्रगती करावी व विविध तंत्रज्ञानाचा वापर करून शेती करावी आणि गडचिरोली पोलीस दलाच्या विविध उपक्रमाचा लाभ घेवुन आपले जीवनमान उंचवावे असे आवाहन केले. तसेच गडचिरोली पोलीस दल, कृषी समृद्धी योजनेतंर्गत उप पोलीस स्टेशन पेरमिली येथे उत्कृष्टरित्या ३००० रोपांची नर्सरी बनविण्यात आली आहे. येथील जमीन काजू पिकाकरिता पोषक असून आपण जर व्यवस्थितरित्या याची जोपासना केली तर निश्चितच आपले जीवनमान बदलेल, याकरिता उपपोस्टेच्या वतीने माडिया व मराठी भाषेतील माहितीपुस्तीकेचे प्रकाशन व वाटप करण्यात आले त्याचा सुद्धा आपल्याला फायदा होईल असे सांगीतले. तसेच नक्षलवाद्यांच्या खोट्या चळवळीला बळी न पडता गडचिरोली पोलीस दलाच्या सहकार्याने जिल्हयाचा विकास साधाया गडचिरोली जिल्हयातील जनतेच्या विकासासाठी सर्वतोपरी मदत केली जाईल असे सांगितले.
आतापर्यंत कृषी विज्ञान केंद्र, तंत्रज्ञान व व्यवस्थापन (आत्मा) सोनापुर, गडचिरोली व बीओआय आरसेटी गडचिरोली यांचे मार्फत पोलीस दाबालौरा खिडकीच्या माध्यमातुन प्रोजेक्ट कृषी समृध्दी अंतर्गत १६,७३९ शेतकन्यांना कृषी बियाणे ५६५ शेतकऱ्यांना कुक्कुटपालन प्रशिक्षण देवून कुक्कुट पक्षी व खाय व भांडी, १०० शेतकऱ्यांना बदकपालन प्रशिक्षण देवून चक्क पक्षी खाय व भांडी, १३९५ शेतकऱ्यांना भाजीपाला लागवड प्रशिक्षण व बियाणे किट, ८७ शेतकन्यांना मत्स्य पालन प्रशिक्षण मत्स्य बीज व खाय, ५३ शेतकऱ्यांना मधुमक्षीकापालन प्रशिक्षण, २७० शेतकन्यांना कृषी दर्शन सहल १४२ शेतकऱ्यांना शेळी पालन प्रशिक्षण, १० शेतकऱ्यांना वराह पालन प्रशिक्षण, ३२६८ शेतकन्यांना शेवगा लागवड प्रशिक्षण देवून प्रत्येकी ३० रोपे, १०० शेतकन्यांना प्रत्येकी २० किलो प्रमाणे एकूण २००० किलो सोयाबीन बियाणे, ७० शेतकऱ्यांना प्रत्येकी ३० किलो याप्रमाणे २१०० किलो करडई बियाणे, ५०० शेतकऱ्यांना पपई लागवड प्रशिक्षण देवून प्रत्येकी ३० रोपे, ५०० शेतकऱ्यांना सिताफळ लागवड प्रशिक्षण देवून प्रत्येकी ३० रोपे द ३००० शेतकऱ्यांना प्रत्येक १० केळीची रोपे वाटप करण्यात आले. असे एकुण २६,५०८ शेतकऱ्यांना विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यात आला आहे.
यावेळी सदर मेळाव्यास पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) अनुज तारे , अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक, अहेरी वतिश देशमुख , उपविभागीय पोलीस अधिकारी, अहेरी अमोल ठाकुर तसेच माऊली मित्र मंडळचे सुहास खरे, अमरस्यरूप फाऊंडेशनचे मनोज चंद्र, वैद्यकिय अधिकारी पेरमिली. गणेश मी, उपविभागीय कृषी अधिकारी अहेरी भाऊसाहेब लवंड, पेरमिली ग्रा.पं. सरपंच किरण नैताम, पत्रकार आसिफखान पठाण व साई चंदनखेडे हे उपस्थित होते.
सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उपविभागीय पोलीस अधिकारी अहेरी तसेच प्रभारी अधिकारी पेरमिली धवल देशमुख, पोउपनि निलेश गायकवाड, पोउपनि दिपक सोनुने व सर्व अंमलदार यांनी अथक परिश्रम घेतले.