नागपूर :- रविवारी 18 मार्च 2024 रोजी, आर.एस.मुंडले धरमपेठ कला वाणिज्य महाविद्यालय नागपूर, विद्याभारती उच्च शिक्षा संस्थान आणि भारतीय भाषा समिती, शिक्षा मंत्रालय, भारत सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित “भारतीय भाषा परिषद महाराष्ट्र आयोजित ” करण्यात येणार आहे.
भारतीय भाषा ही काळाची गरज ठरली आहे. मातृभाषेतून शिक्षण हे संकल्पना स्पष्टीकरण, वैचारिक विकास, सर्वांगीण विकासाला पोषक ठरेल या उद्देशाने भारत सरकार नवीन शिक्षण प्रणाली अंतर्गत राबविल्या जाणाऱ्या योजनान प्रमाणे ही एक योजना भारत सरकार देशभरात राबवत आहे. व त्याचे काम झपाट्याने चालले असल्याचे प्रतिपादन भारतीय भाषा परिषद, नागपूर समन्वयक, आर.एस.मुंडले धरमपेठ कला वाणिज्य महाविद्यालयाच्या प्राध्यपिका आणि विद्या भारती अखिल भारतीय उपाध्यक्ष डॉ. मंजुश्री सरदेशपांडे यांनी पत्रकार परिषदेत पत्रकारांशी माहिती देताना केले. भारतीय भाषांची इकॉसिस्टिम तयार करणे, निरनिराळ्या विषयांचे भारतीय भाषांमध्ये भाषांतर करणे, या बदलाला सामोरे जाण्यासाठी पूर्व तयारी कश्याप्रकारे करायला हवी याबद्दल संस्था चालकांना मार्गदर्शन, भाषा प्रचार व प्रसार करण्यात मीडिया चा सहभाग या बद्दल चे उदबोधन या परिषदे द्वारे होणार असेल्याचे डॉ. सरदेशपांडे यांनी सांगितले. या परिषदेत विदर्भातून विद्यालय व महाविद्यालयाचे 300 शिक्षक हजर असल्याचे ही त्यांनी सांगितले.
पत्रकार परिषदेला आर.एस. मुंडले, धरमपेठ कला वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो. मोहन नगराळे तसेच परिषदेचे सह-समन्वयक डॉ. विवेक दिवाण उपस्थित होते.