संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- दरवर्षी प्रमाणे यावर्षीसुद्धा कर्बला च्या शहिदांच्या स्मरनार्थ 15 जुलै ला सकाळी 8 वाजता हैदरी चौक कामठी येथे अली ग्रुप कामठी च्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे .रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान,जीवनदान आहे तेव्हा 15 जुलै ला आयोजित रक्तदान शिबिरात अधिकाधिक संख्येतील नागरिकांनी सहभाग नोंदवित स्वेच्छेने रक्तदान करावे असे आवाहन आयोजक अली ग्रुप कामठी चे अध्यक्ष कामरान जाफरी यांनी केले आहे.या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आयोजक अली ग्रुप कामठी ला हैदरी जामा मस्जिद ट्रस्ट हुसैनाबाद कामठी,अली सामाजिक संस्था कामठी,अंजुमने अबबासिया हुसैनाबाद कामठी,अंजुमने महाफीजे अजा हुसैनाबाद कामठी,कायमे मेहंदी,हैदरी चौक कामठी,जाफरी ग्रुप हैदरी चौक,कामठी, आदी संस्था सहयोगाची भूमिका दर्शवित आहेत.