यवतमाळ :- आद्य क्रांतीविर राजे उमाजी नाईक प्रमाणपत्र अभियान अंतर्गत जात वैधता प्रमाणपत्र विशेष मोहिम दिनांक 26 फेब्रवारी ते 11 मार्च या कालावधीत आयोजित करण्यात आली आहे. त्याअंतर्गत या कालावधीत जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्यावतीने त्रुती पुर्तता शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.
अभियानांतर्गत दि.1 मार्च, दि.7 मार्च व दि.12 मार्च रोजी जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, डॅा.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, पोलिस दक्षता भवनामागे, दारव्हा रोड, यवतमाळ येथे त्रृती पुर्तता शिबीर घेण्यात येणार आहे.
या कालावधीत 12 ते 5 वाजतापर्यंत ज्या अर्जदारांना समितीकडून त्रुटी पुर्ततेबाबत पत्राने, एसएमएस व ई-मेलद्वारे कळविण्यात आल आहे, त्या सर्व अर्जदरांनी उपरोक्त कालावधीत सर्व मुळ कागदपत्रासह समिती कार्यालयात उपस्थित राहणे आवश्यक आहे. सदर त्रुटी पुर्ततेकरीता जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्यावतीने विशेष सुनावनी कक्षाची निर्मीती देखील करण्यात आली आहे.
या शिबीराचा जास्तीत जास्त अर्जदरांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणीचे समितीचे अध्यक्ष तथा निवडश्रेणी अतिरिक्त जिल्हाधिकारी लक्ष्मण राऊत, उपायुक्त तथा सदस्य प्राजक्ता इंगळे, संशोधन अधिकारी तथा सदस्य सचिव मंगला मुन यांनी केले आहे.