नागपूर :- कौशल्य, रोजगार, उद्योजकता व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्यावतीने 2 जुन रोजी सकाळी 10 वाजता दत्त सभागृह, झिंगाबाई टाकळी येथे छत्रपती शाहू महाराज युवा शक्ती शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
दहावी व बारावी नंतर पुढे काय? भविष्यातील शिक्षण व रोजगार व स्वयंरोजगार संधी, व्यक्तीमत्व विकास, बायोटाडा तयार करणे, मुलाखतीची तयारी, स्पर्धा परिक्षेची पूर्व तयारी, नवीन तंत्रज्ञानावर आधारित प्रशिक्षण व रोजगार संधी या विषयांवर तज्ञांकडून मार्गदर्शन करण्यात येणार आहे. या शिबिराला विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन औद्योगिक प्रशिक्षण संस्थेव्दारे करण्यात आले आहे.