संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- सेठ केसरीमल पोरवाल महाविद्यालयातील प्राणीशास्त्र या विभागातर्फे फायलेरिया आणि मलेरिया या रोगाविषयी विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती व्हावी या अनुषंगाने दिनांक 2,4,सप्टेंबर 2023 रोजी प्रत्यक्ष विद्यार्थ्यांपर्यंत जाऊन या रोगांविषयी माहिती डॉ. नितीन मेश्राम, प्राणीशास्त्र विभागप्रमुख, पोरवाल कॉलेज कामठी, डॉ. नयना दुपारे, वैद्यकीय अधिक्षक उपजिल्हा रुग्णालय कामठी, सुनील नरसीकर, लोकेश भोयर,नारायण राव धावडे , नितीन सवते यांच्या माध्यमातून महाविद्यालयातील 1000 विद्यार्थ्यांना फायलेरिया आणि मलेरिया,ह्या रोगाविषयी औषध सुद्धा वाटप करण्यात आले. तत्पूर्वी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो. डॉ. विनय चव्हाण यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हटले की, फायलेरिया आणि मलेरिया ह्या रोगांचे रुग्ण आपल्या अवतीभवती आढळल्यास सामान्य रुग्णालयाशी तात्काळ संपर्क साधून हा रोगाविषयी जनजागृती करावी असे सांगितले. ह्या मोहिमेमध्ये सूक्ष्मजीव शास्त्राचे विभाग प्रमुख डॉ. आलोक राय, वाणिज्य विभागाचे विभाग प्रमुख डॉ. इत्तेखार हुसैन, डॉ. सुधीर अग्रवाल, उपप्राचार्य ज्यु. कॉलेज यांचा सक्रिय सहभाग होता.
या कार्यक्रमाच्या माध्यमातून वेक्टर वर नियंत्रण आणणे, फायलेरियाच्या रुग्णांची ओळख पटवणे,ही ध्येय होती. डॉ. नयना दुपारे यांनी उपाय सांगताना म्हटले की, सर्वांनी मच्छरदाणी खाली झोपावे, पायामध्ये मौजे किंवा पायघोंळ घालावे, संध्याकाळच्या दरम्यान उघड्या जागेवर प्रतिबंधक औषध फवारावे, आणि मच्छरांचे नियंत्रण करावे. अशा पद्धतीचे उपाय सांगून या रोगावर नियंत्रणासाठी आणण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न केला पाहिजे. असे सांगितले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ. नितिन मेश्राम यांनी प्रचंड मेहनत घेतली होती.