भारतीय जनता युवा मोर्चा महाराष्ट्रच्या वतीने २५ डिसेंबर ते १२ जानेवारी पर्यंत “अटल युवा पर्व” चे आयोजन

वक्तृत्व स्पर्धा, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, युवा वॉरियर शाखेचे उद्घाटन यासह यंग इंडिया रन मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन

– भाजयुमो महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष राहुल लोणीकर यांची माहिती

नागपूर :-भारतीय जनता युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेशच्या वतीने २५ डिसेंबर ते १२ जानेवारीपर्यंत भारतरत्न माजी पंतप्रधान स्व.अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंती दिना पासून ते राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती – १२ जानेवारी अर्थात राष्ट्रीय युवा दिनापर्यंत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून महाराष्ट्रातील तरुणांना वेगवेगळ्या माध्यमातून व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा मानस भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने करण्यात आला असल्याची माहिती भाजयुमोचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष राहुल लोणीकर यांनी दिली.

भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने प्रसिद्ध दिलेल्या पत्रकामध्ये २५ डिसेंबर रोजी “अटल डिबेटिंग क्लब” अंतर्गत अटल वक्तृत्व स्पर्धेचे दोन स्तरावर आयोजन करण्यात आले असल्याची माहिती देण्यात आली आहे त्यामध्ये २५ डिसेंबर रोजी जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धा महाराष्ट्रातील सर्व संघटनात्मक जिल्ह्यांमध्ये संपन्न होणार असून प्रत्येक जिल्ह्यातून प्रथम द्वितीय व तृतीय असे ३ विजेते राज्यस्तरावर पाठवण्यात येणार आहेत तर दिनांक ०५ जानेवारी पूर्वी राज्यस्तरीय स्पर्धा आयोजित केली जाणार असल्याचे राहुल लोणीकर यांनी पत्रकात म्हटले आहे.

भारतरत्न माजी पंतप्रधान स्व. अटलबिहारी वाजपेयी यांची लोकांशी संवाद साधण्याची कला आणि अतुलनीय वक्तृत्व हे राष्ट्र आणि युवकांसाठी सदैव प्रेरणादायी आहे त्यामुळे वक्तृत्वाचा वारसा जपण्यासाठी व वक्तृत्वाची कला अंगी असणाऱ्यांचा यथोचित सन्मान करण्याच्या हेतूने भारतीय जनता युवा मोर्चा मार्फत वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे त्यासाठी १.नरेंद्र मोदी यांचा डिजिटल इंडिया सुशासनावर भर देतो, २.भारत ०५ ट्रिलियन अर्थव्यवस्थेकडे वाटचाल करत आहे, ३.फुकटच्या राजकारणातून विकासाच्या राजकारणाकडे जाणे काळाची गरज, ४ नरेंद्र मोदी यांच्या सरकारचे युवकांच्या सक्षमीकरणावर लक्ष आहे आणि ५.अमृत काल येणारा भारत व युवकांचे योगदान अशा पाच विषयांवर वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे असेही प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात राहुल लोणीकर यांनी स्पष्ट केले आहे.

०३ जानेवारी रोजी भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने मोठ्या प्रमाणात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात येणार असून ०१ जानेवारी ते ०५ जानेवारी यादरम्यान नागपूर अमरावती नाशिक अहमदनगर छत्रपती संभाजी नगर लातूर नांदेड पुणे पिंपरी चिंचवड कोल्हापूर व ठाणे या प्रमुख शहरांसह ज्या ठिकाणी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणारे विद्यार्थी उपलब्ध होतील अशा अन्य शहरांमध्ये देखील आयएएस किंवा आयपीएस दर्जाच्या अधिकाऱ्यांमार्फत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले असल्याचे देखील राहुल लोणीकर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

७ जानेवारी ते ११ जानेवारी या कालावधी दरम्यान जिल्हा निहाय युवा वॉरियर शाखेचे उद्घाटन करण्यात येणार असून त्यामध्ये राज्याचे मंत्री, खासदार, आमदार, भाजपा जिल्हाध्यक्ष, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष, भाजपा प्रदेश पदाधिकारी, युवा मोर्चा प्रदेश पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, मंडळ अध्यक्ष, प्रभारी यांच्यासह अनेकांच्या माध्यमातून १८ ते २४ वयोगटातील तरुणांना या शाखेच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीशी जोडण्याचा प्रयत्न युवा मोर्चा करणार आहे असेही राहुल लोणीकर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

१२ जानेवारी रोजी राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद जयंती अर्थात राष्ट्रीय युवा दिनानिमित्त पाच किलोमीटर धावण्याच्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून या स्पर्धेला यंग इंडिया रन मॅरेथॉन स्पर्धा असे नाव देण्यात आले आहे विविध माध्यमे विविध स्तरावरून सर्वसामान्य तरुणांना सहभागी होण्यासाठी आमंत्रित केल्या जाणारा असून राज्यातील मंत्री आमदार खासदार लोकप्रतिनिधी पक्ष पदाधिकारी स्थानिक प्रभावशाली व्यक्ती यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये ही स्पर्धा पार पडणार असल्याचे देखील राहुल लोणीकर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

@फाईल फोटो

 

 

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

गुंगीचे औषध देऊन तरुणाची लुबाडणूक करणाऱ्या आरोपीस अटक

Sat Dec 24 , 2022
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी ता प्र 24:-स्थानिक नवीन कामठी पोलिस स्टेशन हद्दीत येणाऱ्या कामठी कळमना मार्गावरील एका चहा टपरीवर थांबुन डोनट नावाच्या वस्तूमध्ये गुंगीचे औषध घालून त्याच्याकडील बॅग ,एक मोबाईल , बॅग मध्ये असलेले महत्वपूर्ण कागदपत्र व नगदी 6 हजार 900 रुपये ,इतर साहित्य असा एकूण 20 हजार 900 रूपयाची लुबाडणूक करून पसार झालेल्या आरोपीचा शोध लावून अटक करण्यात […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!