संदीप कांबळे,विशेष प्रतिनिधी
कामठी ता प्र 16 :- भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंतीनिमित्त काल 15 एप्रिल ला रमानगर येथील कमलाबाई वाचनालय च्या वतीने आयोजित भव्य भोजनदान वितरित कार्यक्रमात हजारोच्या संख्येतील नागरिकांनी या भोजनदान वितरित कार्यक्रमाचा आस्वाद घेतला.
या भोजनदान वितरण कार्यक्रमाचे उदघाटन पोलीस उपनिरीक्षक श्याम वारंगे व माजी नगरसेवक लालसिंग यादव,समाजसेवक आशिषभाऊ मेश्राम,दिनेश पाटील यांच्या मुख्य उपस्थितीत विशेष बुद्ध वंदना घेऊन करण्यात आली.दरम्यान कार्यक्रमाचे आयोजक कमलाबाई वाचनालय च्या वतीने कार्यक्रमाचे उदघाटक मुख्य मान्यवरांना शाल ,श्रीफळ व भारतीय संविधान पुस्तक देऊन सम्माणीत करण्यात आले.याप्रसंगी कमलाबाई वाचनालय,राजेश गजभिये,राजेंद्र फुले,सिद्धार्थ बागडे,शुभम वासनिक,राजेंद्र मेंढे,अजय वाघमारे,दीपक बागडे,अनमोल लोणारे,अक्षय गजभिये, अनिल धमगाए,शेखर लोणारे, सोनू चवरे,विभा कांबळे,तुषार गजभिये,साहिल कांबळे,पंकज वाघमारे,,अनिता गजभिये,सुषमा मेंढे, बेबीनंदा वाघमारे, सविता गजभिये,सतीश गजभिये,दीपक बागडे,रुकमाबाई वासनिक,भावना लोणारे,जयश्री बागडे,पंचशीला गजभिये, आदी प्रामुख्याने उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला असून कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कांताबाई वाचनालयच्या समस्त पदाधिकारी व कार्यकर्त्यानी मोलाचे सहकार्य केले.