अरोली :-पोलीस स्टेशन अरोली नागपूर ग्रामीणच्या वतीने दि. १३/०९/२०२४ रोजी भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले.
हर्ष पोहार, पोलीस अधीक्षक, नागपूर ग्रामीण यांच्या संकल्पनेतुन रमेश धुमाळ, अपर पोलीस अधीक्षक नागपूर ग्रा. तसेच रमेश बरकते सा. उपविभागीय पोलीस अधिकारी, रामटेक यांच्या मार्गदर्शनात पोलीस पाटील आणि गणपती मंडळ यांच्या सहकार्यातुन, गणपती महोत्सव आणि ईद मिलाद उन नयी निमीत्त भव्य रक्तदान शिबीर पोलीस स्टेशन अरोलीच्या वतीने पोलीस स्टेशनचे ठाणेदार स्नेहल राऊत, पोउपनि सोनवने, तसेच समस्त पोलीस अंमलदार यांनी अथक परिश्रम करून शिबीर यशस्वी केले. त्यादरम्यान शासकिय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालय, नागपूरचे समाजसेवा अधीक्षक किशोर धर्माळे, सचिन दोड यांच्या पथकाने १०० रक्त दात्यांचे रक्त संकलीत केले. यावेळी अरोली युको बँकच्या शाखा प्रबंधक सीमा चौधरी तसेच अरोली ग्रामपंचायतच्या सरपंच भूरे, प्रशांत भूरे तसेच जि. प. सदस्य योगेश देशमुख, धानोली येथील सरपंच अमोल नरूले यांनी शिबीराला भेट दिली.
यामध्ये ठाणेदार स्नेहल राऊत यांनी सर्व रक्तदात्यांचे मनः पर्वक आभार मानले आहे. तसेच गणेशोत्सव आणि ईद मिलाद उन नबी हे दोन्ही सण शांततेत व कोणत्याही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण न होता, हर्ष उल्हासात पार पाडण्याबाबत आवाहन केले आहे.
त्याचप्रमाणे शिबीरादरम्यान समर्थ रामदास हायस्कुलच्या विद्यार्थ्यांनी जनजागृतीपर परिसर स्वच्छता वर नाटिका सादर केली.