नागपूर : जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाद्वारे जिल्हास्तरीय युवा महोत्सवाचे आयोजन 28 डिसेंबर रोजी करण्यात येत आहे. महोत्सवाअंतर्गत लोकगीत, लोकनृत्य या कला बाबींचा सहभाग राहणार असून लोकगीताकरिता साथसंगत देण्याऱ्या सह जास्तीत जास्त 50 स्पर्धक तसेच लोकनृत्याकरिता साथसंगत देण्याऱ्या सह 20 स्पर्धक सहभागी होऊ शकतात. यामध्ये सहभागी होणाऱ्या स्पर्धक व साथसंगत देण्याऱ्याचे वय 15 ते 29 या वयोगटातील असावे. (12 जानेवारी 1994 नंतरचा तसेच 12 जानेवारी 2008 पूर्वीचा जन्म झालेला असावा.)
लोकगीत सादर करण्याऱ्या संघाने गीत चित्रपटबाह्य असावे व पार्श्वगायन सादर करण्याऱ्या संघाना यामध्ये प्रवेश नोंदविता येईल. तसेच लोकनृत्य सादर करणाऱ्या संघाने पुर्वध्वनीमुद्रीत टेप अथवा कॅसेटला परवानगी दिली जाणार नाही. लोकनृत्य हे चित्रपटबाह्य असावे.
जिल्हयातील युवा महोत्सवात जास्तीत जास्त शाळा, महाविद्यालय तसेच सांस्कृतिक मंडळांनी प्रवेश अर्ज 27 डिसेंबर 2022 पूर्वी जन्मतारखेच्या दाखल्यासह कार्यालयीन कामाच्या दिवशी व वेळेत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, विभागीय क्रीडा संकुल, कोराडी रोड, मानकापूर, नागपूर येथे सादर करावे व अधिक माहितीकरीता 8857944259 या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी कळविले आहे .