एटीकेटी’धारक विद्यार्थ्यांना ६ महिन्यांचा शैक्षणिक भत्त्यासहित निधी त्वरीत उपलब्ध करून देण्याबाबतचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना द्यावेत – खासदार सुप्रिया सुळे

खासदार सुप्रिया सुळे यांचे परदेशी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मुख्यमंत्र्यांना पत्र…

मुंबई  :- ‘राजर्षी शाहू महाराज परदेशी शिक्षण शिष्यवृत्ती’ही योजनेतील ‘एटीकेटी’धारक विद्यार्थ्यांचा सहानुभूतीपुर्वक विचार करून या योजनेतील त्रुटी दुर कराव्यात तसेच त्या विद्यार्थ्यांना ६ महिन्यांचा शैक्षणिक भत्त्यासहित निधी त्वरीत उपलब्ध करून देण्याबाबतचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना द्यावेत अशी मागणी करणारे पत्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिले आहे.

महाराष्ट्र शासनाच्यावतीने अनुसूचित जाती व नवबौद्ध समाजातील विद्यार्थ्यांसाठी ‘राजर्षी शाहू महाराज परदेशी शिक्षण शिष्यवृत्ती’ही योजना राबविण्यात येते. या योजनेमध्ये परदेशातील विद्यार्थ्यांची शिक्षण पूर्ण फी, आरोग्य विमा व व्हिसा शुल्क शिष्यवृत्तीधारकांना मिळते.तसेच विद्यार्थ्यांना प्रत्येक वर्षी उत्तीर्ण होणे बंधनकारक असून तसा प्रगती अहवाल प्रत्येक सत्रासाठी दर ६ महिन्यांसाठी सादर करणे आवश्यक आहे.परंतु या योजनेत निवड झालेले विद्यार्थी हे पहिल्यांदाच परदेशात गेलेले असतात.त्यांना तेथील भौगोलिक परिस्थिती, वातावरण यांच्याशी एकरूप होण्यास वेळ लागतो. घरापासून दूर असल्यामुळे आजारपण व नव्या भाषेचेही मोठे दडपण त्यांच्यावर असते. याशिवाय जेवढा भत्ता या शिष्यवृत्तीद्वारे त्यांना मिळतो त्यामध्ये काटेकोरपणे त्यांना आपला खर्च भागवावा लागतो ही बाब खासदार सुप्रिया सुळे यांनी निदर्शनास आणून दिली आहे.

हे विद्यार्थी परिस्थितीशी जुळवून घेत तेथे शिक्षण घेतात. यामुळे अनेकदा हे विद्यार्थी एक किंवा दोन विषयामध्ये अनुत्तीर्ण होऊ शकतात. अशा विद्यार्थ्यांची शासनाच्यावतीने शिष्यवृत्ती व निर्वाहभत्ता बंद केला जातो या शासकीय नियमातील त्रुटीवर खासदार सुप्रिया सुळे यांनी लक्ष वेधले आहे.

या विद्यार्थ्यांवर परदेशात आपला खर्च भागविण्यासाठी अतिशय कठिण परिस्थितीत पडेल ते काम करण्याची वेळ ओढावते.याचा परिणाम त्यांच्या अभ्यासावर देखील होतो. हे लक्षात घेता राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अशा विद्यार्थ्यांचा सहानुभूतीपुर्वक विचार करावा अशी विनंतीही खासदार सुप्रिया सुळे यांनी पत्रात केली आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

हलबा समाज परिवारिक मंडळाच्या नविन कार्यालयाचे उदघाटन

Tue Feb 7 , 2023
नागपूर : हलबा समाज परिवारिक मंडळाच्या सर्व सदस्यांना सूचीत करण्यात अत्यंत आनंद होत आहे की आपल्या मंडळाच्या नवीन कार्यालयाच्या उदघाटन गुरुवार दि. 02.02.2023 ला सायंकाळी 4.00 वाजता राजेंद्र सोनकुसरे माजी नगरसेवक सभापती स्थापत्य व प्रकल्प समिती,मनपा सदस्य शिक्षण समिती यांचे हस्ते पार पडले . याप्रसंगी माजी आमदार धनराज कुंभारे प्रामुख्याने उपथीत होते. जवळ जवळ 100 सभासद व 25 महिला महिला […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!