संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
– विद्यार्थ्यांनी फळांच्या गुणधर्मासह चाखली चव.
कन्हान :- येथील धर्मराज प्राथमिक शाळेत आज (ता २९) अभिनव संकल्पनेतून “आँरेंज डे ” साजरा करुन विद्यार्थ्यांना संत्रीच्या चवीचा मनमुराद आस्वाद घेता आला.
हिवाळ्यात मोठ्या प्रमाणात शरीराला पोषक असलेल्या फळांची आवक होत असते. मात्र प्रत्येकच जण प्रत्येक फळ विविध कारणांच्या सबबीमुळे खाऊ शकत नाही. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्यांला फळाचा आस्वाद चाखता यावा यासाठी शिक्षणाधिकारी (प्राथ) रोहिणी कुंभार व गटशिक्षणाधिकारी कैलास लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्याध्यापक खिमेश बढिये यांनी हा फ्रूट डे उपक्रम राबविला. या उपक्रमांतर्गत आज प्रत्येक विद्यार्थ्यांना संत्री देण्यात आली. मुख्याध्यापक खिमेश बढिये यांनी संत्रीचा हंगाम, संत्री मध्ये आवश्यक असलेले गुणधर्म, जिवनसत्वे, संत्री खाल्ल्यामुळे हद्यविकाराचा धोका टळतो, प्रतिकारशक्ती वाढते, कर्करोग विरुद्ध लढ्यास मदत, डोळे निरोगी ठेवण्यास व केस गळणे थांबवि ण्यासाठी मदत होते अशी माहिती देत प्रत्येकाने ऋतू नुसार फळांचे सेवन करावे, असे आवाहन केले. कार्यक्रमाचे संचालन भिमराव शिंदेमेश्राम यांनी करत विद्यार्थ्यांना फळे खाण्याचे आवाहन करुन नवीन शैक्षणिक धोरणांतर्गत यावर माहिती लिहण्याचे आवाहन केले. या अभिनव उपक्रमाचे सुंदर फलक लेखन अमीत मेंघरे यांनी केले तर राजु भस्मे यांनी संत्री खाण्याचे प्रात्यक्षिक करून दाखविले. कार्यक्रमाच्या आयोजनासाठी सर्व शिक्षकांनी सर्वतोपरी सहकार्य केले.