– ‘मविआ’च्या आंदोलनाचा पीपल्स रिपब्लिकन पार्टी तर्फे तिव्र निषेध
नागपूर :- बदलापूरमधील शाळेतल्या चार वर्षाच्या दोन चिमुकल्या मुलींवर सफाई कामगाराने केलेल्या अमानुष अत्याचाराच्या दुर्देवी घटनेनंतर अख्खं महाराष्ट्रात संतप्त प्रतिक्रीया येत आहे. महायुती सरकारने या प्रकरणाची अतिशय गंभीर दखल घेतली असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आरोपीला कठोर शिक्षा देण्यासाठी धाडसी निर्णय घेतले आहे. प्रकरणाला जलदगती न्यायालयात खटला चालवून दोन महिन्यात आरोपीला फाशी देण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहे. तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पोलिस महानिरीक्षक दर्जाच्या वरिष्ठ आयपीएस अधिकारी आरती सिंग यांच्या अध्यक्षतेखाली एसआयटी गठित करण्याचे आदेश दिले आहेत. राज्य सरकारने घेतलेले निर्णय हे आरोपीला जलद शिक्षा देणारे आहे. अशातच महा विकास आघाडीच्या नेत्यांचेकडून दररोज येणारे बैताल वक्तव्य हे, संतुलन बिघडल्यानंतर दिल्या सारखे आहे. तसेच शनिवारी राज्यात मविआचे होत असलेले आंदोलन हे राजकीय भाकरी शेकण्यासाठी विरोधक पायपीट करीत असल्याची खोचक टिका पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष जयदीप कवाडे यांनी दिली.
प्रसिद्धी पत्रकाद्वारे जयदीप कवाडे यांनी सांगितले की, घृणास्पद घडलेल्या या घटनेच्या निषेधार्थ आणि आरोपीला फाशी व्हावी म्हणून, हजारो बदलापूरकर रस्त्यावर उतरून त्यांनी आक्रमक आंदोलन केले. या घटनेला महाराष्ट्र सरकारने तातडीने दखल घेत आरोपीला शिक्षा देण्यासाठी पोलिस यंत्रनेला सूचना दिल्या आहेत. तसेच राज्यातील प्रत्येक शाळेत आता विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही अनिवार्य करण्यात यावे. तसेच प्रत्येक शाळेत महिला सफाई कर्मचारीच प्रसाधनगृहाची जबाबदारी सांभळणे हे बंधनकार करण्याचे सरकारने निर्णय घेतले आहे, जे कौतुकास्पद आहे. अशातच बदलापुर घटनेवर राजकीय खिचडी शिजविण्यासाठी मविआकडून महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली. यावर महाराष्ट्र बंदविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. हाई कोर्टाने तातडीची सुनावणी पार पाडत निर्णय दिला की, कोणत्याही राजकीय पक्षाला बंद करण्याची परवानगी नाही. जर कोणी तसा प्रयत्न करत असेल तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी, असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिले आहेत. आंदोलनाची अतिघाई पणाची चपकराच महा विकास आघाडीला मिळाली आहे. मात्र, असे असतांना काळ्या फिती लावून आंदोलन करणारे विरोधक हे, राज्यातील जनतेपुढे आपला हसा उडवित असल्याचेही जयदीप कवाडे म्हणाले.
महायुती सरकारची सुरू असलेली विकास कामे आणि जनतेसाठी राबविण्यात आलेल्या योजनांना राज्यात मिळणारा सकारात्मक प्रतिसादातून दिसत आहे. राज्यात आगामी निवडणुकीत महायुतीचीच सरकार येणार असल्याचे स्पष्ट संकेतच आहे. राज्यात, केंद्रात सुरू असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे काम हे सगळे बघून विरोधकांचे संतुलन बिघडून ते वैफल्यग्रस्त परिस्थितींना तोंड देत असल्याचेही जयदीप कवाडे म्हणाले. राज्यात विरोधकांच्या आजच्या आंदोलनाला पीपल्स रिपब्लिकन पार्टी तिव्र निषेध करीत असल्याचेही जयदीप कवाडे म्हणाले.