चारधाम यात्रेसाठी ऑनलाईन नोंदणी आवश्यक,भाविकांना उत्तराखंड शासनाचे आवाहन

नागपूर :- चारधाम यात्रेसाठी संपूर्ण भारतातून भाविक मोठ्या प्रमाणात उत्तराखंड येथे पोहचत असल्यामुळे प्रशासनाच्या व्यवस्थेवर ताण पडत आहे. भाविकांना सुलभ व सहजपणे यात्रा पूर्ण करता यावी यासाठी ऑनलाईन नोंदणी करणे अनिवार्य करण्यात आले आहे. त्यामुळे ऑनलाईन केल्याशिवाय चारधाम यात्रेचे नियोजन करु नये असे आवाहन उत्तराखंड राज्याच्या मुख्य सचिव राधा रतुडी यांनी केले आहे.

चारधाम यात्रेतील दर्शनाचे प्रक्रिया सुलभ व्हावी तसेच भाविकांना ऑनलाईन नोंदणीनुसार सहज दर्शन उपलब्ध करण्याच्या दृष्टीने उत्तराखंड प्रशासनाने https://registrationandtouristcare.uk.gov.in संकेतस्थळ सुरु केली आहे. ऑनलाईन पध्दतीने नोंदणी केलेल्या भाविकांना दर्शन घेता येणार आहे. तसेच चारधाम यात्रा २४ साठी व्यवस्थेच्या दृष्टीने दिनांक ३१ मे २०२४ पर्यंत व्हीआयपी दर्शनांची सुविधा बंद करण्यात आली आहे.

जेष्ठ नागरीक, तसेच वैद्यकीय उपचार घेत असलेल्या नागरिकांना यात्रा सुरु करण्यापूर्वीचे वैद्यकीय प्रमाणपत्र सोबत असणे अनिवार्य करण्यात आले आहे. यासंबंधित उत्तराखंडच्या सार्वजनिक आरोग्य व कुटूंब कल्याण मंत्रालयाने मार्गदर्शक सूचना सांगितलेल्या असून https://health.uk.gov.in/pages/display/140-char-dham-yatra-health-advisory या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

नागपूर विभागातील चारधाम यात्रेसाठी नियोजन केलेल्या सर्व भाविकांनी ऑनलाईन नोंदणी करुनच प्रवास करावा तसेच यात्रेदरम्यान होणारी गैरसोय व गर्दी टाळावी, असे आवाहन विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी केले आहे.

@ फाईल फोटो

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

ईअर टॅगींग असल्याशिवाय पशुधनाच्या वाहतूकीला बंदी

Thu May 30 , 2024
  भारत पशुधन प्रणालीवर नोंदणी करणे अनिवार्य    खरेदी विक्री, पशुधन बाजार समित्यांमध्ये प्रवेश नाही  नागपूर :- सर्व पशुधनाची सर्वंकष माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध व्हावी यासाठी पशुसंवर्धन विभागाद्वारे नॅशनल डिजीटल लाईव्हस्टॉक मिशन “भारत पशुधन” प्रणालीमध्ये नोंदणी प्रक्रीया सुरु करण्यात आली आहे. पशुधनामधील सांसर्गीक रोगांना प्रतिबंधक व नियंत्रण अधिनियमाद्वारे सर्व पशुधनांचे ईअर टॅगींग करुन या प्रणालीवर नोंद करणे बंधनकारक करण्यात आले असल्याची […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com