फोन करून क्रेडीट कार्ड मधुन एक लाख ४४ हजार ९४५ रूपये काढुन फसवणुक

संदीप कांबळे,कामठी

कन्हान : – पोलीस स्टेशन अंतर्गत उत्तरेस १.५ कि मी अंतरावरील शिवाजी नगर कन्हान येथील रहिवासी तेजप्रकाश तिवारी यांच्या क्रेडिट कार्ड चे खात्यातुन कोणीतरी अज्ञात आरोपी ने १,४४,९९५ रूपये काढुन फरवणुक केल्याने कन्हान पोलीसांनी अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.
प्राप्त माहिती नुसार सोमवार (दि.९) मे ला रात्री ७ वाजता दरम्यान तेजप्रकाश दिलहरण तिवारी वय ३४ वर्ष राह. शिवाजी नगर कन्हान हे आपल्या घरी हजर असतांना मो.क्र. ९०९१३६५५९८ या फोन नंबर वरून तेजप्रकाश तिवारी यांना मो.क्र.९५४५६४६१०५ वर फोन करून म्हटले की, मी अँक्सीस बँक मुंबई येथुन बँक अधिकारी बोलतो असे म्हणुन तुमचे क्रेडीट कार्ड वर रिवार्ड पाईंट मिळाले आहे. तुम्ही जर ते युझ केले तर तुम्हाला गिफ्ट वाउचर मिळेल असे आमिष दाख वुन तेजप्रकाश तिवारी यांच्या मोबाईल वर लिंक पाठ वुन त्या लिंक ला ओपन करण्यास लावुन एक ओटीपी आला. तो आरोपीस पाठविला असता तेजप्रकाश तिवारी च्या क्रेडीट कार्ड चे खात्यातुन १,४४,९९६ रूपये काढुन त्यांची फसवणुक केल्याने कन्हान पोलीसांनी फिर्यादी तेजप्रकाश तिवारी यांच्या तोंडी तक्पारी वरून अज्ञात आरोपी विरुद्ध अप क्र २७९ /२०२२ कलम ४२० भादंवि सहकलम ६६ (ड) मा.तं. अधि. अन्वये गुन्हा दाखल केला असुन पुढील तपास कन्हान पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक विलास काळे यांच्या मार्गदर्शनात कन्हान पोलीस करीत असुन आरोपीचा शोध घेत आहेो.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

शेतकरी बांधवांना दर्जेदार, प्रमाणित बियाण्यांचा पुरवठा करा - कृषीमंत्री दादाजी भुसे यांचे निर्देश

Thu May 12 , 2022
खरीप हंगामातील बियाणे उपलब्धता व पुरवठा; बीजोत्पादनाचा कृषीमंत्र्यांनी घेतला आढावा मुंबई  : राज्यातील शेतकरी बांधवांना खरीप हंगाम-2022 मध्ये दर्जेदार, प्रमाणित बियाण्यांचा पुरवठा करावा, बियाण्यांची उपलब्धता, पुरवठा सुरळीत व्हावा, सोयाबीनचा पेरा वाढण्याची शक्यता गृहीत धरून सोयाबीनच्या बियाण्यांच्या उपलब्धतेबाबत नियोजन करावे, तेलबियांच्या बियाणांची उपलब्धता वाढवावी,   योजनांच्या माध्यमातून उभ्या केलेल्या बीज प्रकल्पांना गती द्यावी, कोणत्याही शेतकरी बांधवांची तक्रार येऊ नये यासाठी काटेकोर नियोजन करावे, […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com