१० वीच्या पुरवणी परिक्षेचे ऑनलाईन पद्धतीने आवेदन पत्र ३१ मे पासून

नागपूर :- माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र पुरवणी परीक्षा (इयत्ता १०वी) जुलै-ऑगष्ट २०२४ मध्ये घेण्यात येणार आहेत. या परिक्षेसाठी ३१ मे २०२४ पासून ऑनलाईन पद्धतीने आवेदन करता येणार असून ११ जुन २०२४ अंतिम मुदत असणार आहे, असे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या नागपूर विभागीय मंडळाच्या सहायक सचिव कल्पना लांडे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.

१०वी चा निकाल 27 मे 2024 रोजी ऑनलाईन पद्धतीने जाहीर झाला असून पुरवणी परीक्षा जुलै 2024 मध्ये घेण्यात येणार आहे. या परिक्षेस पुनर्परिक्षार्थी, यापूर्वी नाव नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खाजगी विद्यार्थी तसेच श्रेणी सुधार योजनेंतर्गत व तुरळक विषय घेऊन प्रविष्ट होणारे विद्यार्थी, आयटीआय विषय घेऊन प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांची आवेदनपत्रे (आयटिआयद्वारे ट्रान्सफर ऑफ क्रेडिट घेणारे विद्यार्थी) स्विकारण्यात येणार आहेत.  www.mahahsscboard.inया संकेतस्थळावर आवेदन करता येणार असून विद्यार्थ्यांनी त्यांच्या माध्यमिक शाळांमार्फतच ही आवेदन पत्रे भरता येणार आहेत. सर्व माध्यमिक शाळांनी ऑनलाईन आवेदन पत्रे भरण्यासाठी घालून दिलेल्या नियमांचे पालन करुन कार्यवाही करण्याचे निर्देश मंडळाकडून देण्यात आले आहे.

११ जून २०२४ ही आवेदनाची अंतिम तारीख असून विलंब शुल्कासह १२ ते १७ जुन पर्यंत आवेदनपत्र भरता येणार आहे. माध्यमिक शाळांनी १ ते १९ जुन २०२४ दरम्यान बँकेत चलनाद्वारे शुल्क भरावयाचे असून माध्यमिक शाळांनी विभागीय मंडळाकडे शुलक्‍ भरल्याच्या चलनासह २१ जुन २०२४ पर्यंत विद्यार्थ्यांच्या याद्या जमा करावयाच्या आहेत.

@ फाईल फोटो
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

पंधराव्या वित्त आयोगाचा निधी थकल्याने कामठी नगर पालिकेवर कर्जाचे डोंगर

Fri May 31 , 2024
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी :- मागील काही वर्षांपासून कामठी नगर पालिकेला केंद्र शासनाकडून मिळणारा पंधराव्या वित्त आयोगाचा निधी न मिळल्याने शहरातील घनकचरा व्यवस्थापन,पाणी पुरवठा व पथदिव्याचे देयके अदा करण्यासाठी मोठी आर्थिक अडचण निर्माण झाली असून कामठी नगर पालिकेवर कर्जाचे डोंगर उभे झाले आहे.या पंधराव्या वित्त आयोगाच्या निधी अभावी शहरातील घनकचरा व्यवस्थापन कोलमडण्याच्या मार्गावर आहे तसेच शहरातील पथदिव्यांच्या विद्दूत पुरवठ्यासह […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com