ऑनलाइन आभा कार्ड योजना फायद्याची की फसवणूक

– वक्ता कॉ. राजेंद्र साठे, कॉ. प्रीती मेश्राम, कॉ. रंजना पौनीकर

– मागण्या मान्य न झाल्यास १८ ऑक्टोबर पासून बेमुदत संप – सीटू

 – व्हेरायटी चौकातून आशा व गटप्रवर्तकांचे काम बंद ठेऊन मोर्चा

नागपूर :- ऑनलाइन आभा कार्डच्या नावाने शिव गौरी बहुउद्देशिय संस्था, अडगाव (खुर्द) तः जी. अकोट, अकोला पत्र क्र. -आ वी / ३९८६/ आ.अ. (एम) NUHM/२२ दिनांक – ५-१२-२०२२ रोजी पासून काम करण्याचा आदेश देण्यात आला. त्यानंतर तक्रार झाल्यानंतर दिनांक -४-५-२०२३ रोजी आदेश रद्द करण्यात आला. एन जी ओ तर्फे वेगवेगळ्या वसाहतीत कॅम्प लावून पी एच सी अंतर्गत मेडिकल ऑफिसर यांनी आशा वर्कर यांना लाभार्थ्यांना आभा कार्ड बनवण्याकरता बोलवण्याच्या सूचना दिल्या. त्या अनुसार आशा वर्कर यांनी लाभार्थ्यांना कॅम्प लावलेल्या ठराविक जागी बोलावल्यानंतर ज्या एन जी ओ कडे महानगर पालिके तर्फे जिम्मेदारी देण्यात आली होती त्यांच्या कर्मचाऱ्यांनी ५० रुपये प्रति कार्ड घेऊन नागरिकांची फसवणूक केली. ४ महिन्यापेक्षा अधिक कालावधी होऊन सुद्धा नागरिकांना आभा कार्ड मिळाले नसल्यामुळे नागरिकांचा रोष आशा वर्कर वर तुटून पडला. आपल्या भागामध्ये फिरून आशा वर्कर यांना काम करणे कठीण होत आहे. काही नागरिकांनी तर आशा वर्कर च्या नावे पोलीस तक्रार सुद्धा केली. परंतु महानगरपालिका यावर दुर्लक्ष करीत आहे. भारत सरकार तर्फे प्रत्येक नागरिकाला मोफत आरोग्य सुविधा मिळावी म्हणून आभा कार्ड योजना आणण्यात आली आणि कमी शिक्षित असलेल्या आशा वर्कर कडे फक्त ५ रुपये मोबदल्यावर ऑनलाईन पद्धतीने आभा कार्ड बनवण्याची जिम्मेदारी देण्यात आली. कमी शिक्षित असलेल्या किंवा ग्रामीण क्षेत्रात राहणाऱ्या आशा वर्कर यांना आभा कार्ड बनवणे शक्य नाही. खाजगी एन जी ओं ना लाखो रुपये मोजून देणारे शासन आशा वर्कर च्या मोबदल्यामध्ये वाढ का करू शकत नाही हे एक कोडे आहे. हा सर्व घटनाक्रम घडल्यानंतर आशा वर्कर कशा पद्धतीने आभाळ कार्ड बनवण्याचे कार्य करतील आणि नागरिकांच्या रोष आपल्यावर ओढून घेतील त्यामुळे सर्व प्रकारचे ऑनलाइन काम करण्याच्या आशा वर्कर यांनी इंकार केला आहे. यावर तातडीने शासनाने विचार करावा हीच आशा व गटप्रवर्तक कर्मचारी युनियन (सी आय टी यू) ची प्रमुख मागणी आहे.आशा व सुपरवायझर ( गटप्रवर्तक ) कर्मचारी युनियन ( सी आय टी यू ) नागपूर जिल्हा तर्फे संविधान चौक येथे आशा वर्कर व गटप्रवर्तक यांनी ३ ऑक्टोंबर रोजी तीव्र आंदोलन करून सरकारवर रोष व्यक्त केला.राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांची नेमणूक झाल्यापासून दिवसें दिवस कामाचा दबाब वाढवण्यात येत आहे. अल्प मोबदल्यात काम करणाऱ्या स्वयंसेविका स्वतः विधवा, घटस्फोटीत किंवा ज्यांची आर्थिक बाजू कमकुवत आहे अशा असून वाढत्या महागाईच्या काळात प्रपंच चालवणे कठीण होत आहे. त्यामुळे ३ ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र आशा गटप्रवर्तक कृती समितीने राज्यभर विविध मागण्या करता आंदोलन केले. त्या अनुषंगाने सी आय टी यू तर्फे संविधान चौकात धरणे आंदोलन करण्यात आले. आंदोलनाचे नेतृत्व कॉ.राजेंद्र साठे, कॉ. प्रीती मेश्राम व कॉ. रंजना पौनिकर यांनी केले होते. धरणे आंदोलनात शेकडो आशा वर्कर व सुपरवायझर उपस्थित होत्या. आपल्या भाषणातून व निदर्शनातून कर्मचाऱ्यांनी राज्य सरकार व केंद्र सरकारच्या कामगार विरोधी भूमिकेचा तीव्र निषेध केला. मागण्या १७ ऑक्टोबर पर्यंत मान्य न झाल्यास १८ ऑक्टोबर पासून संपूर्ण राज्यातील आशा वर्कर व सुपरवायझर मागण्या मान्य होईपर्यंत संपावर जातील. अशी घोषणा सीटू तर्फे करण्यात आली. कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांना घेऊन शिस्ट मंडळ मां. जिल्हाधिकारी यांना भेटून आरोग्य मंत्री व आरोग्य संचालक यांचे नावे निवेदन सादर केले.

– मागण्या

(१) आशा व सुपरवायजर यांना ५ हजार दिवाळी बोनस द्या.

(२) गटप्रवर्तक यांचा आशा सुपरवायजर नामोल्लेख करण्यात यावा.

(३) आशा – सुपरवायजर यांना ऑनलाइन डाटा एन्ट्री सक्ती करू नये.

(४) आशा व सुपरवायझर यांना किमान वेतन देण्यात यावे.

(५) आशा सुपरवायझर यांना कंत्राटी कर्मचारी प्रमाणे समायोजित करण्यात यावे.

(५) सी एच ओ नसलेल्या सब सेंटर मधील आशा वर्कर ला आरोग्य वर्धिनीचा निधी मेडिकल ऑफिसर च्या सहीने देण्यात यावा.

(६) आशा सुपरवायझर यांना १५०० रु. महिना आरोग्य वर्धीनी निधी देण्यात यावा.

(७) शासकीय सुट्टीचे दिवशी लाभार्थीची माहिती मागवू नये.

(८) लाभार्थीची माहिती सकाळी ८ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंतच मागवण्यात यावी. इतर वेळेस मॅसेज किंवा फोन करू नये.

(९) डेंग्यू, क्षयरोग, कुष्ठरोग कामाचा २०० रू.रोज देण्यात यावा.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

जीवन विकास शिक्षण संस्था कर्मचारी पतसंस्थेची सर्वसाधारण सभा संपन्न

Sat Oct 14 , 2023
– जीवनविकास शिक्षण संस्था कर्मचारी पतसंस्थेच्या आमसभेत सेवानिवृत्त शिक्षकांचा सत्कार नागपूर :- जीवनविकास एज्युकेशन सोसायटी सेवकांची सहकारी पतसंस्था, आयुर्वेदिक लेआऊट, उमरेड रोड,नागपूर या संस्थेची सन 2020- 2023 ची वार्षिक सर्वसाधारण सभा शनिवार, दि. 30 सप्टेंबर 2023 ला, बाबुराव झाडे नवप्रतिभा हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात संस्थेचे अधक्ष प्रवीण झाडे यांचे अधक्षतेखाली संपन्न झाली. सभेला माझी अधक्ष व शिक्षक भारतीचे राज्य उपाधक्ष […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com