संदीप कांबळे कामठी
कामठी ता प्र 6:-स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या कामठी रेल्वे स्टेशन सायकल पार्किंग जवळ एका अनोळखी इसमाचा उष्माघाताने मृत्यू झाल्याची घटना आज दुपारी 4 दरम्यान घडली.
प्राप्त माहितीनुसार उन्हाचा प्रकोप हा वाढीवर असून उन्हाचा पारा हा 44 अंश पर्यंत पोहोचला असून अंगाची लाहीलाही होत आहे.सुजाण नागरिकानी या उन्हात निरर्थक घराबाहेर पडणे बंद पडले असून घरातच पंखे, कुलर , एसी च्या कवेत राहून वर्क फ्रॉम होम या पद्ध्तीने वागत आहेत, रस्ते शुकशुकाट आहेत मात्र अशा परिस्थितीत निराधार नागरिकांचा कुणीही वाली नसल्याने या निराधाराणा या असहनिय वातावरणाचा फटका सहन करावा लागतो आणि याच फटक्यातून आज एका अनोळखी इसमाचा उष्मघाताने दुर्दैवी मृत्यू झाला .
घटनेची माहिती मिळताच नवीन कामठी पोलीस स्टेशन चे पोलीस कर्मचारी रितेश पांडे, संदीप भोयर यांनी त्वरित घटनास्थळ गाठून घटनास्थळाचा पंचनामा करीत मृतदेह ताब्यात घेत पुढील उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह नजीकच्या शासकीय उपजिल्हा रुग्णालय कामठी च्या श्वविच्छेदनगृहात हलविण्यात आले.मृतकाची वय अंदाजे 50 असून अजूनपावेतो ओळख पटलेली नाही.पोलिसांनी यासंदर्भात आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे.
उष्मघाताला बळी पडला एक अनोळखी इसम
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com