पारशिवनी तहसीलदार प्रशांत सांगडे मार्फत जिल्हाधिकारी यांना कर्मचार्यांचे निवेदन.
गटविकास अधिकारी सुभाष जाधव याना दिले निवेदन.
पारशिवनी :- पारशिवनी पंचायत समिती अंतर्गत महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतील प्रमुख कणा ग्रामरोजगार सेवक आपल्या प्रमुख मागण्यांसाठी संपूर्ण महाराष्ट्रात कामबंद आंदोलन करत असुन यांच योजनेतील सहाय्यक कार्यक्रम अधिकारी, तांत्रिक सहाय्यक, लिपिक कम डाटा एन्ट्री आॅपरेटर या कंत्राटी कर्मचार्यांनीसुध्दा आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी बुधवार १८ जानेवारीला संपूर्ण महाराष्ट्रात एक दिवसीय लाक्षणिक संप पुकारला आहे. त्यांच धर्तीवर पारशिवनी पंचायत समिती अंतर्गत कार्यरत मनरेगा कंत्राटी कर्मचार्यांचा एक दिवसीय लाक्षणिक संप पारशिवनी पंचायत समिती कार्यालया समोर सुरू झाला.
या संदर्भात निवेदन पारशिवनी चे तहसीलदार प्रशांत सांगडे. गटविकास अधिकारी सुभाष जाधव यांना व जिल्हाधिकारी नागपूर व पंचायत समिती सभापती मंगला निबोने यांना देण्यात आले आहे.
मागण्या पूर्ण न झाल्यास २५ जानेवारी पासून असहकार आंदोलन. त्या नंतर ही मागण्या मान्य झाल्या नाहीत. तर १ फेब्रुवारीपासून बेमुदत संप फुकारण्याचा इशाराही देण्यात आला.याप्रसंगी उपस्थित मनरेगा कर्मचारी प्रकाश देशमुख, नंदकिशोर रामटेके, दिनेश कामळी, रविन्द्र भगत, दामोधर कोंजरे, ग्रामरोजगार सेवक संघटना पारशिवनी तालुका अध्यक्ष चक्रधर मस्के, रामकृष्ण कापसे, राजकुमार मेश्राम, राजेश सावरकर, प्रकाश ठाकूर, नंदू कोचे, संजय केळकर, गजानन संग्रपवार, चंद्रशेखर बाजनघाटे, किष्णा मसुरे सह अनेक कर्मचारी लाक्षणिक संपात पंचायत समिती समोर सहभागी झाले होते.