– भदंत ससाई यांची माहिती
नागपूर :- अखिल भारतीय धम्मसेना, तसेच भिक्खू आणि भिक्खूनी संघाच्या संयुक्त वतीने बोधिसत्त्व नागार्जुन महाविहार, नागार्जुन टेकडी परिसर, रामटेक येथे बुधवार, 26 फेब्रुवारी रोजी एकदिवसीय बोधिसत्त्व नागार्जुन बुद्ध महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती भदंत ससाई यांनी दिली.
दिवसभर चालणाऱ्या या नागार्जुन संरक्षण महोत्सवात डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती, दीक्षाभूमीचे अध्यक्ष व धम्मसेना नायक भदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई मार्गदर्शन करतील. यावेळी बुद्ध-भीम गीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. बोधिसत्त्व नागार्जुन यांनी या टेकडीवर रसायन आणि आयुर्वेदासंबंधी अनेक संशोधन कार्य केले. या ठिकाणी पुरातन अवशेष (मूर्ती, स्तूप) मोठ्या प्रमाणावर आहेत. ऐतिहासिक ठेवा असल्याने त्याचे संरक्षण आणि जतन करून महत्त्वाची माहिती जनसामान्यांपर्यंत पोहोचविणे आवश्यक आहे. त्याअनुषंगानेही हा महोत्सव महत्त्वाचा आहे. या कार्यक्रमाला उपासक, उपासिका, धम्म बांधव, आंबेडकरी अनुयायी यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन भदंत ससाई यांनी केले आहे.