संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- आपल्या दैनंदिन जीवनात पैशाची कमतरता व अडचण नेहमीच जाणवत असते पैशाचा योग्य वापर कसा करावा व चांगल्या पैशाच्या नियोजनासाठी एनजीओ नीट फाऊंडेशन यांच्या वतीने कामठी तालुक्यातील गुमथी गावी डिजिटल आर्थिक साक्षरता कार्यक्रम राबविण्यात आला. माहिती व आयोजन नीट फाऊंडेशन चे राजेंद्र कावळे यांनी केले. या प्रसंगी सरपंच सीमा मोरे उपस्थीत होते. या कार्यक्रमाअंतर्गत बँकेचे व्यवहार, सेविंग अकाऊंट, करंट अकाऊंट, इन्शुरन्स, ए.टी.एम चा वापर, अर्थिक फसवणूक, फेक कॉल्स केंद्र शासन व महाराष्ट्र शासनाच्या विविध योजना बाबत मोलाचे मार्गदर्शन केले. विशेष म्हणजे ग्रामीण भागातील जनतेमधे अर्थिक व्यवहार कसे असले पाहिजे व डिजिटल तंत्रद्यान तसेच चांगल्या पैशाचे व्यवस्थापन या विषयी जनजागृति करण्यात आली. या कार्यक्रमासाठी अर्थिक सौजन्य स्पंदना स्फूर्ती फा नेशियल ली. यांचे लाभले,यावेळी गावातील जनतेचा उस्फूर्त प्रतिसाद लाभला. तसेच कार्यक्रमात सहभाग घेणाऱ्या महिलांना प्रमाणपत्र चे वाटप देखील करण्यात आले.