नागपूर :- विद्युत ग्राहकांना नवीन वीज कनेक्शन घेण्यापासून बिले भरणे, तक्रारी नोंदविणे आणि वीजचोरीची खबर देणे अशा विविध सुविधा आपल्या बोटावर असलेल्या महावितरणच्या मोबाईल ॲपला ग्राहकांचा प्रतिसाद मिळत असून केवळ गुगल प्ले वरुन मोबाईलमध्ये ॲप डाऊनलोड करण्याची संख्या 50 लाखांपेक्षा अधिक असून ॲपलच्या ‘ॲप स्टोर्स’ वरुन देखील लाखोच्या संख्य्ने महावितरण मोबाईल ॲप डाऊन लोड करण्यात आले आहे.
ॲप डाऊनलोड करून ते सतत वापरणाऱ्या ग्राहकांची संख्या 30 लाखांपेक्षा अधिक असून या ॲपचा वापर करणा-या ग्राहकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. महावितरणच्या ग्राहकांना मोबाईल ॲपचा वापर करून महावितरणच्या अनेक सेवा सहजपणे मोबाईल फोनवरून मिळविता येतात. नवीन कनेक्शनसाठी अर्ज करणे, त्यासाठीची कागदपत्रे अपलोड करणे आणि त्यासाठीची फी भरून नवीन कनेक्शन मिळविणे ही सुविधा ॲपमार्फत उपलब्ध आहे. या ॲपवरून ग्राहकांना आपले विजेचे बिल पाहता येते आणि भरताही येते. वीजबिलाची नोटिफिकेशन आणि बिल भरल्याची माहिती या ॲपद्वारे उपलब्ध होते. ग्राहकांना वीजेच्या बाबतीत तक्रार नोंदविणे आणि आपल्या तक्रारीवर पुढे काय कारवाई झाली याची माहिती घेणे ॲपमुळे सोपे जाते. वीजचोरीची खबर देण्याचीही सुविधा या ॲपवर उपलब्ध आहे. मोबाईल ॲपवरून ग्राहकांना आपल्या मीटरचे रिडिंग स्वतःच भरता येते. जवळचे महावितरणचे कार्यालय अथवा बिल भरणा केंद्र कोठे आहे आणि तेथे कसे जायचे, याचीही माहिती ॲपवरून मिळते.
महावितरणचे ऍप एक, सुविधा अनेक
· वीजबिल पहा आणि भरा
· रिडींग उपलब्ध न झाल्यास स्वतः अचूक रिडींग पाठविण्याची सुविधा
· नवीन वीज कनेक्शनसाठी अर्ज करण्याची सुविधा
· वीज वाहिन्यांच्या माहितीची सुविधा
· नादुरुस्त रोहीत्राच्या माहीतीची सुविधा
· वीजचोरी कळविण्याची सुविधा
· गो ग्रीन नोंदणी सुविधा
· पुनर्जोडणी शुल्क भरण्याची सुविधा
· सौर कृषीपंप अर्जाच्या सद्यस्थितीची सुविधा
· विजेसंबंधी तक्रार नोंदणी आणि तक्रारीचा पाठपुरावा करण्याची सुविधा
· महावितरणच्या सुविधेचा लाभ घेण्यासाठी संपर्क क्रमांक / ई – मेल
· महावितरण ग्राहक सेवेबद्दल अभिप्राय नोंदविण्याची सुविधा
· जवळील महावितरण कार्यालय व भरणा केंद्रे नकाशावर पहा
· मासिक वीज देयकांची अंदाजित तपशील
· नावात बदल करण्याकरीता अर्ज व वीजजोडणीचा भार कमी / जास्त करण्याकरीता अर्ज