– नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी विक्रमी रायडरशिप
नागपूर, २ जानेवारी: नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी नागपूर मेट्रोनेमोठा पल्ला गाठत ५०,००० ची प्रवासी संख्या पार केली. काल म्हणजे १ जानेवारी २०२२ रोजी महा मेट्रोचीप्रवासी संख्या ५१,६७० होती. महा मेट्रो नागपूरच्याइतिहासात हि दुसऱ्या क्रमांकाची प्रवासी संख्या होती. या आधी २६ जानेवारी २०१९ हाच आकडा ६०,१७१होता. रायडरशिपच्या याकालच्या आकडेवारीमुळे आता महा मेट्रोने इतर मेट्रो सेवांना मागे टाकले आहे. खरं तर गेल्या काही दिवसापासून सातत्याने महा मेट्रोची प्रवासी संख्या वाढत असून सध्या रोजची रायडरशिप सुमारे ३५,००० च्या सुमारास आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटे नंतरच्या काळात नागपूरकरांनी महा मेट्रोवर मोठ्या प्रमाणात विश्वास दाखवल्याने हि संख्या वाढत आहे.
२०२२ चा पहिला दिवस असल्याने, नागपूरकर मोठ्या प्रमाणात घरा बाहेर पडले होते. याचाच परिणाम म्हणजे मेट्रोच्या ऑरेंज (खापरी ते कस्तुरचंद पार्क मेट्रो स्टेशन) आणि एक्वा (लोकमान्य नगर ते सीताबर्डी इंटरचेंज) मार्गिकांवर एकत्रितपणे हि विक्रमी प्रवासी संख्या झाली.
महा मेट्रोच्या स्थानकावरील तिकीट विक्री खिडक्यांसमोर आज सकाळपासूनच प्रवाश्यांची मोठी गर्दी होती. विशेषतः सीताबर्डी इंटरचेंज येथे सर्वात जास्त प्रवासी संख्या बघायला मिळाली. प्लॅटफॉर्म, कोनकोर्स येथे प्रवाश्यांची चांगलीच गर्दी होती.
नागपूरकरांकडून असा प्रतिसाद मिळणार हे अपेक्षित असल्याने त्या करता महा मेट्रो प्रशासनाने व्यवस्था केली होती. या करता मेट्रो स्थानकांवर कर्मचारी तैनात केले होते. सुरक्षा रक्षक, स्टेशन वरील इतर कर्मचारी नेमणूक केली होती.
महा मेट्रोच्या गाडीने सातत्याने प्रवास करणाऱ्या श्रीमती अनुराधा पांडे यांनी मेनी केले कि त्यांनी अशी गर्दी कधीच बघितले नाही. येत्या काळात हि संख्या वाढणार असल्याचे त्या म्हणाल्यात. स्थानिक उद्योजक श्री विकास सिंह म्हणाले की स्थानकांवरील फिडर सारख्या सेवांमुळे मेट्रोप्रवासाची महत्ता वाढते.
नवीन वर्षाच्या पहिल्या दिवसाची हि विक्रमी रायडरशिप प्रवाश्यांचा मेट्रो वरील विश्वास अधोरेखित करतो. येत्या काही दिवसात ऑरेंज आणि एक्वा मार्गिकांवर प्रवासी सेवा सुरु होणार असल्याने, महा मेट्रोचा रायडरशिप ग्राफ पुढे देखील असाच वाढणार हे निश्चित आहे.