संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- श्री सदाशिवराव पाटील शिक्षण संस्था कामठी या न्यासाचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी आमदार स्व. यादवराव भोयर यांच्या चतुर्थ पुण्यतिथी निमित्त संस्थेच्या कामठी येथील शैक्षणिक परिसरात श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
कामठी येथील संस्थेच्या शैक्षणिक परिसरातील स्व. यादवरावजी भोयर मेमोरियल हॉल येथे संस्थेच्या अध्यक्षा किशोरी भोयर, सचिव सुरेशभाऊ भोयर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा श्रद्धांजलीचा कार्यक्रम घेण्यात आला.
याप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी आपल्या शाब्दिक मनोगतात आदरांजली अर्पण केली. यावेळी फार्मसी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मिलिंद उमेकर, कामठी तंत्रनिकेतन चे प्राचार्य मुकेश घोळसे, प्राचार्या ईशा मुदलियार, प्राचार्य डॉ. दिलीप कोहळे, उन्मेष पोकळे, डॉ. अतुल हेमके तसेच संस्थेतंर्गत महाविद्यालयाचे सर्व वरिष्ठ प्राध्यापक गण, शिक्षक व सर्व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी यावेळी श्रध्दांजली अर्पण केली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन फार्मसी महाविद्यालयाच्या प्राध्यापिका नेहा राऊत यांनी केले.