विधानपरिषद शतक महोत्सवानिमित्त विधानपरिषदेचे सन्माननीय सदस्य आणि नागपूर मधील ज्येष्ठ पत्रकार यांच्या उपस्थितीत हिवाळी अधिवेशनानिमित्त आज दिनांक 8 रोजी विशेष चर्चासत्र

नागपूर :- महाराष्ट्र विधानपरिषदेच्या शतक महोत्सवी वर्षानिमित्त महाराष्ट्र विधानपरिषदेच्या उप सभापती, डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या संकल्पनेनुसार विधानपरिषदेचे सन्माननीय सदस्य आणि नागपूर मधील ज्येष्ठ पत्रकार यांच्या उपस्थितीत हिवाळी अधिवेशनानिमित्त आज दिनांक ८ डिसेंबर, २०२३ रोजी सकाळी ९.०० वाजता विधानपरिषद सभागृह, विधान भवन, नागपूर येथे “महाराष्ट्र विधिमंडळ संसदीय वाटचालीत हिवाळी अधिवेशनाचे महत्वपूर्ण योगदान” या विषयावर विशेष चर्चासत्र आयोजित करण्यात आले आहे.

या कार्यक्रमासाठी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उप मुख्यमंत्री  अजित पवार,  संसदीय कार्य मंत्री चंद्रकांत पाटील, विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, विधानसभेचे  विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार या मान्यवरांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.

देशातील संसदीय लोकशाहीच्या संदर्भात व्दिसभागृह व्यवस्थेत महाराष्ट्र विधानपरिषदेने उल्लेखनीय योगदान देत आपला वैशिष्ट्यपूर्ण ठसा उमटविला आहे. माँटेग्यू-चेम्सफर्ड शिफारशीनुसार भारत सरकार अधिनियम, १९१९ अन्वये “Bombay Legislative Council” ची प्रारंभिक बैठक १९ फेब्रुवारी, १९२१ रोजी टाऊन हॉल मुंबई येथे झाली. श्री. नारायण गणेश चंदावरकर यांची विधानपरिषदेच्या सभापतीपदी झालेली नियुक्ती ही एक ऐतिहासिक घटना होती. सन १८६२ ते सन १९२० पर्यंत Governor of Bombay यांच्या अध्यक्षतेखाली Council चे कामकाज चालत होते. सन १९२१ मध्ये श्री. नारायण चंदावरकर यांच्या रुपाने पहिल्यांदा भारतीय व्यक्तीची सभापती म्हणून नियुक्ती झाली. सन १९२१ ते २०२१ हा महाराष्ट्र विधानपरिषद शतकपूर्तीचा कालखंड मानता येईल. तथापि, कोविड-१९ महामारीमुळे त्‍यावेळी जाहीर कार्यक्रम घेणे शक्य झाले नाही.

विधानपरिषदेचे सन्माननीय सदस्य आणि नागपूर मधील ज्येष्ठ पत्रकार यांना दि. ८ डिसेंबर रोजी होणाऱ्या या कार्यक्रमास निमंत्रित करण्यात आले असून यानिमित्त जुन्या आठवणींना तसेच विधानपरिषदेच्या शतकमहोत्सवी वाटचालीतील हिवाळी अधिवेशनातील वैशिष्ट्यपूर्ण ठरलेल्या प्रसंगांना उजाळा मिळणार आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

महाराष्ट्र विधानपरिषद (हिवाळी अधिवेशन, डिसेंबर २०२३,नागपूर ) थेट प्रक्षेपण

Fri Dec 8 , 2023
Follow us on Social Media x facebook instagram

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com