संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
– वाण खरेदीकडे महिलांची लगबग
कामठी :- मकरसंक्रातीचा सण अवाघ्या तीन दिवसावर येऊन ठेपला आहे.त्यानिमित्ताने बाजारपेठेत महिलांची लगबग संक्रात साहित्य खरेदीसाठी दिसायला लागली आहे.
वर्षातील पहिला सण मकरसंक्रांत त्यामुळे प्रत्येक सणाचे वेगवेगळे महत्व आहे.मकर संक्रांतीपासून दिवस तीळाप्रमाणे वाढत असतो असा समज पूर्वीच्या लोकांचा होता व तो खराही आहे कारण मकरसंक्रातीपासून पृथ्वीचा उत्तरगोलार्धात प्रवेश होत असतो याच दिवशी मकर संक्राती सनानिमित्त धार्मिक महत्व असून या दिवशी कुटुंब संबंध सुधारण्याची संधी मिळत असते .कळत नकळत कुणाला कटू शब्द बोलले तर त्याची माफी मागून आपले संबंध पूर्ववत करता येतात त्यासाठीच तिळगुळ घ्या व गोड गोड बोला व तिळगुळ खाण्याची परंपरा आजही कायम आहे.
भारतीय संस्कृती कृषिप्रधान असल्यामुळे पौष महिन्यातील हा काळ रब्बी हंगामाच्या सुगीचा मानला जातो यावेळी शेती बहरलेली असते त्यामुळे बळीराजाही समाधानी असतो या दिवसापासून दिवस तीळातीळाणे मोठा होत असतो .सूर्याने मकर राशीतून जाणे म्हणजेच संक्रमण करणे होय पौष महिन्यात सूर्य मकर राशीत प्रवेश करतो त्यामुळेच या सणाला मकरसंक्रांत असे म्हणतात .या सणाच्या निमित्ताने परिचित लोकांकडे जाऊन जुनी भांडणे विसरून नव्याने स्नेहाचे संबंध निर्माण करण्यासाठी या सनाच्या निमित्ताने तीळ गूळ घ्या गोड गोड बोला असे म्हणून एकमेकांशी स्नेह निर्माण करून भेट वस्तू आदान प्रदान करण्यात येत असते.