आंतरराष्ट्रीय अंध अपंग दिन या पर्वावर मतदार जनजागृती कार्यक्रम भंडारा जिल्हात संपन्न

भंडारा :- आंतरराष्ट्रीय अंध अपंग दिन या पर्वावर मतदार जनजागृती कार्यक्रम भंडारा जिल्ह्यातील भागीरता भास्कर अंध विद्यालय मधून मतदारांना मतदानाचे महत्त्व सांगून, EVM संबंधी तसेच मतदानाच्या वेळी हाताळायच्या संपूर्ण बाबींविषयी माहिती देऊन,मतदाराची ओळख पटविण्यासाठी आवश्यक असणारे विविध पुरावे कोणते यांची माहिती विषद करून यशस्वीपणे मतदार जनजागृती करण्यात आली.

मतदार जनजागृती कार्यक्रमांतर्गत सांगितलेली माहिती विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांपर्यंत पोहचवावी व मतदारांना त्यांच्या कर्तव्याची जाणीव करून द्यावी असेही आवर्जून सांगण्यात आले.

या पर्वावर भंडारा जिल्हात मतदार जनजागृती कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न झाला.या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नोडल अधिकारी सलामे E.O. (माध्य), विद्यालयाचे मुख्याध्यापक उमाप यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच सहकारी  फसाटे, झुरमुरे, मरगडे,सावरकर, वैरागडे, यांचे सहकार्य लाभले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

मतदार जागृती कार्यक्रमांतर्गत EVM वर ब्रेल लिपीचे प्रात्यक्षिक

Tue Jan 9 , 2024
भंडारा :- निवडणूक विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या SVEEP कार्यक्रमांतर्गत विशेष गरजा असलेल्या अंध मतदात्यांसाठी व विद्यार्थ्यांसाठी EVM मशीनवर असलेल्या ब्रेन लिपीच्या माध्यमातून मतदान करण्याच्या पद्धतीचे प्रात्यक्षिक काल 06 जानेवारी 2024 ला भागीरथा भास्कर विद्यालयात पूर्ण करण्यात आले. यावेळी 15 ते 17 वयोगटातील विद्यार्थ्यांनी EVM वरील ब्रेन लिपीच्या प्रात्यक्षिकाचा उत्स्फूर्तपणे अनुभव घेतला. मतदार जागृती कार्यक्रमाचा एक भाग म्हणून SVEEP कार्यक्रमाच्या माध्यमातून […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com