9 ऑगस्ट क्रांती शहीद दिना निमित्त नागपूर महानगरपालिकेद्वारा हुतात्मा स्मारकास पुष्प्‍चक्र अर्पण

नागपूर :- नागपूर महानगरपालिकेच्या वतीने ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त देशासाठी शहिद झालेल्या स्वातंत्र्य संग्राम सैनिकांना अभिवादन करण्यात आले. फ्रिडम पार्क शहिद स्मारक येथे नागपूर जिल्हा स्वातंत्र्य संग्राम सैनिक गौरव समिती तर्फे आयोजित कार्यक्रमात मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, अतिरक्ति आयुक्त न‍िर्भय जैन यांनी शहिदांना पुष्प चक्र अर्पण करून श्रद्धांजली वाह‍िली.

यावेळी माजी आमदार आणि स्मारक समितीचे प्रमुख  यादवराव देवगडे, दीनानाथ पडोळे, माजी विपक्ष नेता मनपा तानाजी वनवे, लीला चितळे, संतोष खोब्रागडे, रघुवीर देवगडे, संजय गुप्ता, दिलीप धोटे, मिलिंद माकडे, विनोद दरोडी, जिल्हा माहिती अध‍िकारी प्रव‍िण टाके, मनपा चे जनसंपर्क अधिकारी मनिष सोनी, सहायक अधिक्षक राजकुमार मेश्राम, अमोल तपासे, शैलेश जांभुळकर, अग्निशमन दलाचे जवान इत्यादी उपस्थित होते.

तसेच 9 ऑगस्ट क्रांती दिना निमित्त नागपूर, महानगरपालिकेद्वारे शहीद स्तंभ चौक इतवारी तसेच कॉटन मार्केट येथील शहीद स्मारकास पुष्प्‍चक्र अर्पण करून नागपूर नगरीतर्फे हुतात्म्यास श्रद्धांजली अर्पण करून विन्रम अभिवादन करण्यात आले.

या प्रसंगी माजी महापौर, दयाशंकर तिवारी, अमोल तपासे,  शैलेश जांभुळकर तसेच अग्निशमन दलाचे जवान उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता पसरविणा-या 101 प्रकरणांची नोंद, उपद्रव शोध पथकाची धडक कारवाई

Wed Aug 9 , 2023
नागपूर :- नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करणाऱ्यांवर, कचरा फेकणाऱ्यांवर, थुंकणाऱ्यांवर, ५० मायक्रॉन पेक्षा कमी प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्यांवर अधिक कठोर कारवाई ची सुरुवात केली आहे. मंगळवार (08) रोजी शोध पथकाने 101 प्रकरणांची नोंद करून 50200 रुपयाचा दंड वसूल केला. शहराला स्वच्छ ठेवण्यासाठी रस्त्यावर, फुटपाथवर कचरा टाकणारे, थुंकणारे, घाण करणारे, लघुशंका करणारे, प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्या नागरिकांवर […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com