संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- आज नागपंचमीच्या दिवशी आनंद नगर कामठी रहिवासी राजू बागडे यांच्या घराच्या गोठ्यात सकाळी 8 वाजता सहा फूट लांबीचा अजगर दडी मारून बसल्याचे लक्षात येताच घरमंडळीत भीतीमय वातावरण पसरले.ही बाब शेजारचे कोमल लेंढारे यांना कळताच लेंढारे यांनी त्वरित सर्पमित्र अनिल बोरकर यांच्याशी भ्रममध्वनिवर संपर्क साधुन घटनास्थळी बोलवले.यावेळी वाईल्ड लाईफ वेल्फेअर सोसायटी चे सदस्य सर्पमित्र अनिल बोरकर यांनी त्वरित घटनास्थळ गाठून दडी मारुन बसलेल्या अजगर ला ताब्यात घेत अधिवासात सोडून जीवनदान दिले.,व बागडे कुटुंबीयांनी मोकळा श्वास घेतला.